Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै १८, २०२१

अकरावी प्रवेशासाठी CET घेणार 19 जुलैपासून सुरु होणार ONLINE नोंदणी




अकरावी प्रवेशासाठी CET घेणार 19 जुलैपासून सुरु होणार ONLINE नोंदणी

 
राज्य मंडळाचे अध्यक्ष दिवाकर टेमकर 



अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या सीईटी परीक्षेत बाबत आपल्या मनात असलेले प्रश्न दूर करा   👇👇

✅ १६ जुलै २०२१ ला दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल लागला. महारष्ट्र राज्याचा ऐतिहासिक असा 95.95% निकाल लागला.

💥यानंतर आता अकरावीच्या प्रवेशासाठी CET म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा होणार आहे. ऑगस्ट महिन्यात किंवा जुलै च्या शेवटच्या महिन्यात ही परीक्षा होणार असून *19 जुलै* पासून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाई फॉर्म भरता येतील. 

💥महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषद https://www.maa.ac.in या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना हे अर्ज ऑनलाई पद्धतीने *19 जुलै सोमवारपासून* भरता येतील.

💥परंतु परीक्षा ही *ऑफलाईन* पद्धतीने होणार आहे.विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र कुठे असेल हे नंतर सांगण्यात येतील.

💥फॉर्म भरण्याची पद्धत एकदम सोप्पी ठेवण्यात आली आहे.या ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर एक स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात येईल.

💥या पोर्टल वर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांना आपला बोर्डाचा बैठक क्रमांक भरावा लागेल.
💥यानंतर परीक्षा द्यायची की नाही असे दोन पर्याय दिले जातील.यापैकी कोणताही पर्याय विद्यार्थी निवडू शकतो.

💥ही परीक्षा *ऐस्छिक* असून अकरावी परीक्षेत पहिले *प्राधान्य हे CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना* असणार आहे.

💥 *परीक्षेचे स्वरूप -

ही परीक्षा 100 गुणांची असून यात *गणित,समाजशास्त्र, विज्ञान आणि इंग्रजी* या चार विषयांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक विषयावर *25 गुणांचे* प्रश्न विचारले जाणार आहेत.
💥परीक्षेसाठी कालावधी हा 2 तासांचा असणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.