नागपूर, दिनांक१७ जुलै २०२१-
वापरलेल्या वीजेचे देयकापोटी असलेली रक्कम न भरल्याने महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला. काही काळानंतर आकडा टाकून अवैध पणे वीज पुरवठा सुरू केला असता त्यास महावितरणच्या जनमित्राने प्रतीबंध केला असता त्याला मारहाण करणाऱ्या *"आकडेबाज"* ग्राहकाच्या विरोधात लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
महावितरण कडून देण्यात आलेल्या माहिती नुसार, महावितरणचे जनमित्र जगदीश डकाह हे आपल्या शाखा अभीयंता यांच्या आदेशानुसार शुक्रवार, दिनांक १६ जुलै रोजी नेहरु पुतळा, मिर्ची बाजार परिसरात थकबाकीदार ग्राहकाकडून वीज देयकाची वसुली करीत होते.तेलीपुरा परिसरात ससुनिसा अब्दुल हमीद या वीज ग्राहकाची जोडणी थकबाकीमुळे काही दिवसांपूर्वी डकाह यांनी खंडित केली होती. थकबाकीची रक्कम न भरता वीज ग्राहकाने थेट आकडा टाकून वीजपुरवठा सुरू केला होता. ही बाब डकाह यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी वीज वाहिनीवर पुन्हा टाकलेला आकडा काढून टाकला.
वीज पुरवठा खंडित करून पोल वरून खाली उतरले असता मोहम्मद इजाज अब्दुल हमीद या व्यक्तीने जगदीश डकाह यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी लकडगंज डकाह यांनी तक्रार केली असता आरोपी मोहम्मद इजाज अब्दुल हमीद याच्या विरोधात भादवि कलम ३५३, ५०४ आणि वीज कायदा-२००३ कलम १३८ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.