Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै १३, २०२१

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून दुचाकीसह फुटाळा तलावात उडी

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून दुचाकीसह फुटाळा तलावात उडी
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
नागपूर /अरुण कराळे ( खबरबात )
नागपूर तालुक्यातील वाडी येथील कंट्रोलवाडीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधून दुचाकीसह फुटाळा तलावात उडी घेतल्याची घटना उघडकीस आली . अथर्व राजू आनंदेवार वय १९ वर्ष असे मृत तरुणाचे नाव आहे. अथर्वचे वडील टाईल्स स्कॅन कंपनीत कामाला आहेत , तर आणि आई गृहिणी आहे . अथर्व हा विशेष जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत होता. सोमवार १२ जुलै रोजी दुपारी १२.२५ च्या सुमारास तो एमएच ३१ एफएम १०८८ क्रमांकाच्या पल्सर २०० दुचाकीने फुटाळा तलाव येथे आला . त्याने आपल्या तीन मित्रांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले आणि मी फुटाळा तलावात आत्महत्या करीत असल्याचे मित्रांना सांगितले . मित्रांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आम्ही फुटाळा येथे येतो तोपर्यंत थांब असे म्हटले . तत्पूर्वीच अथर्व दुचाकीने वायुसेना नगराकडे जाणाऱ्या मार्गावर पोहचला. या परिसरात तलावाचा सपाट भाग आहे. त्याचप्रमाणे दुपारी त्या परिसरात वर्दळ देखील कमी असते. त्यामुळे अथर्व ने भरधाव दुचाकी तलावाच्या दिशेने जात तलावात उडी घेतली आणि थेट पाण्यात पोहचला.त्याला पोहता येत नसल्याने तो दुचाकीसह पाण्यात बुडाला. रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांच्या लक्षात हा प्रकार आला. तोपर्यंत त्याचे तीनही मित्र फुटाळा येथे पोहचले होते. काही लोकांनी आरडाओरड करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अंबाझरी पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला . पोलिसांनी अग्निशमन दलाच्या आणि पोहणाऱ्यांच्या मदतीने त्याचा शोध घेतला. दुपारी दोनच्या सुमारास त्याची दुचाकी हाती लागली . त्याच परिसरात अथर्वचा शोध घेतला असता त्याला मृतावस्थेत बाहेर काढले. अथर्वने आत्महत्या का केली ? हे समजू शकले नाही . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , सोमवारी सकाळी अथर्वचे त्याच्या कुटुंबियासोबत कसल्यातरी कारणावरून वाद झाला होता . रागाच्या भरात तो दुचाकी घेऊन घराबाहेर पडला अशी माहिती आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.