Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै १५, २०२१

असोला मेंढा विकास व सौंदर्यीकरणासाठी पर्यटन विभाग घेणार पुढाकार |


चंद्रपूर जिल्हयातील असोलामेंढा तलाव परिसर सौंदर्यीकरणासाठी 20 कोटींचा निधी द्या




चंद्रपूर जिल्हयातील असोलामेंढा तलाव परिसर सौंदर्यीकरणासाठी 20 कोटींचा निधी द्या

Ø पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची पर्यटन मंत्र्यांकडे मागणी



चंद्रपूर जिल्ह्यातील असोला-मेंढा धरण येथे पर्यटन विकास करण्याबाबत व जिल्ह्यातील इतर स्थळांवर नाविन्यपूर्ण पर्यायांचा वापर करून पर्यटनास चालना देण्याबाबत बैठक झाली. तसेच चंद्रपूर शहरात औष्णिक विद्युत केंद्रामुळे निर्माण होणाऱ्या समस्या जाणून घेतल्या व प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव, पर्यटन संचालक धनंजय सावळकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली आहे.


चंद्रपूर जिल्हयातील असोलामेंढा तलाव हा इंग्रजकालीन असून 114 वर्ष जुना आहे. या परिसरात देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असल्याने या परिसराच्या विकासासाठी किमान 20 कोटी निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.

चंद्रपूर जिल्हयातील असोलामेंढा येथील परिसराच्या सौंदर्यीकरणाबाबत मंत्री वडेट्टीवार यांच्या दालनात बैठक पार पडली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर, आर्किटेक्ट भिवागडे यांच्यासह या विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी असोलामेंढा तलाव परिसरातील सौंदर्यीकरण करण्याबाबतचे सादरीकरण करण्यात आले.

श्री.वडेट्टीवार म्हणाले, असोलामेंढा तलाव हा जंगलव्याप्त परीसर असून तलाव आणि परिसर हे जलसंपदा विभागाकडे येत असून परिसरातील जागा जलसंपदा विभागाची आहे. या परिसराला देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. मात्र पर्यटकांच्या दृष्टीने या ठिकाणी सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे या परिसराचे सुशोभिकरण करून साहसी पर्यटन सुविधा दिल्या तर पर्यटनात वाढ होईल. त्याचबरोबर स्थानिक रोजगारसुध्दा वाढेल. त्याकरीता किमान 20 कोटींचा निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, असोलामेंढा तलाव क्षेत्रातील पर्यटन क्षेत्र विकासाबाबत विभागामार्फत आपण निश्चीत निर्णय घेऊ व त्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. तलाव परिसरातील सौंदर्यीकरण जर महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत करावयाचे झाल्यास ही जागा जलसंपदा विभागामार्फत एमटीडीसीकडे हस्तांतरित करावी लागेल. त्याचबरोबर स्थानिक क्षेत्रात हॉटेल व्यवसायिकांशी प्राथमिक चर्चा करून सार्वजनिक – खाजगी सहभागातून त्यांनाही यामध्ये संधी देता येते, का याची पाहणी करण्याचे आश्वासन यावेळी पर्यटन मंत्र्यांनी दिले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.