Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २३, २०२१

इरई नदीवरील स्टेड- ब्रिजला 'रामसेतू' नामकरणाचा ठराव


Resolution to rename the Stade-Bridge on the Erie River as 'Ramsetu'

चंद्रपूर, ता. २३ : इरई नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, हा पूल आता लोकसेवेत रुजू झाला आहे. अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधीमंडळ तथा माजी कॅबीनेट मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून दाताळा रोडवरील इरई नदीवर उभारण्यात आलेल्या भव्य स्टेड-ब्रिजला 'रामसेतू' हे नाव देण्याचा ठराव २३ जून रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिककेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.


चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात २३ जून रोजी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, सभागृह नेता संदीप आवारी, भाजपचे गटनेता वसंत देशमुख, विरोधी पक्षनेता डॉ. सुरेश महाकुलकर, बसपचे गटनेता अनिल रामटेके, शिवसेनेचे गटनेता सुरेश पचारे आदींसह आभासी माध्यमातून झोन सभापती, सर्व नगरसेवक उपस्थित होते.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे यांनी सभागृहात अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधीमंडळ तथा माजी कॅबीनेट मंत्री (म.रा) आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून दाताळा रोड मार्गातील इरई नदीवर उभारण्यात आलेल्या भव्य स्टेड - ब्रिजला 'रामसेतू' हे नाव देण्याची मागणी केली. मुंबईच्या धर्तीवर अतिशय भव्य असा स्टे -ब्रिज साकारण्यात आलेला आहे. ब्रीजमुळे चंद्रपूर शहराचे नावलौकिक झाले. स्टेड - ब्रिजच्या आकर्षणामुळे अतिशय कमी कालावधीत स्टेड-ब्रिज संपुर्ण शहरवासीयांसाठी एक पर्यटन स्थळ ठरले आहे. 


त्याचप्रमाणे इरई नदी दाताळा रोड लगत असलेल्या परिसर हा जगन्नाथबाबा यांची पावन नगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे संपुर्ण शहरवासी इरई नदी दाताळा रोड या मार्गात उभारण्यात आलेल्या भव्य स्टेड - ब्रिज बघण्यासाठी येत असतात. या स्टेड - ब्रिजला 'रामसेतू' असे नाव देण्याचा प्रस्ताव सभागृहात ठेवण्यात आला. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.