Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २३, २०२१

जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी शासकीय जागा हस्तांतरणाचा ठराव पारित



Passed a resolution to transfer government land for the memorial of Jananayak Birsa Munda

चंद्रपूर, ता. २३ :
जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी सौंदयीकरण देखभाल करण्याकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या दिनांक २३/०६/२०२१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे ठराव क्र. ०९ अन्वये शासकीय जागा चंद्रपूर शहर महानगरपालिकेला हस्तांतरण करण्याचा ठराव पारित करण्यात आला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात २३ जून रोजी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, सभागृह नेता संदीप आवारी, भाजपचे गटनेता वसंत देशमुख, विरोधी पक्षनेता डॉ. सुरेश महाकुलकर, बसपचे गटनेता अनिल रामटेके, शिवसेनेचे गटनेता सुरेश पचारे आदींसह आभासी माध्यमातून झोन सभापती, सर्व नगरसेवक उपस्थित होते.

जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकासाठी भूमी अधिग्रहणाबाबतचा ठराव घेण्यात यावा, अशी मागणी आदिवासी समाजबांधवांसह नगरसेविका शीतल आत्राम, शीतल कुळमेथे, ज्योती गेडाम, चंद्रकला सोयाम, माया उईके यांनी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्याकडे केली होती. अध्यक्ष, लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधीमंडळ तथा माजी कॅबीनेट मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, महापौर यांची संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक त्रुटी दूर करून आदिवासी बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्याची सूचना दिली होती. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक पुढाकार घेऊन महापौर राखी संजय कंचर्लावार विशेष लक्ष दिले.

चंद्रपूर शहरातील मोहल्ला जटपूरा -१, शिट नं, २३, नगर भूमापन क्र. २३३६पैकी (मालमत्ता पत्रकानुसार) क्षेत्र ५४.०० चौ.मी. भारत संचार निगत लिमिटेडच्या भिंतीलगत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर शासकीय जागा सौंदर्यीकरण, देखभाल करण्यासाठी विनामुल्य महानगरपालिकेस हस्तांतरीत करुन देण्याबाबतचा प्रस्ताव विहीत नमुन्यातील प्रपत्र भाग 'अ', 'ब' 'क', 'स'मध्ये मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे या कार्यालयाचे पत्र क्र. चंशमनम / नर / ३१२७ / २०२१, दिनांक १ ९/०३ /२०२१ अन्वये सादर करण्यात आलेले आहे. या शासकीय जागा सौंदर्यीकरण व देखभाल करण्याकरीता चंद्रपूर शहर महानगरपालिकेस हस्तातरीत करण्याच्या प्रस्तावासह चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा ठराव आवश्यक असल्याने जागा हस्तांतरणाबाबतचा ठराव तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे सादर करण्याबाबत सहाय्यक अधिक्षक (जमीन), जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांचे कार्यालयीन पत्र क्र. मशा/ कार्या -४ / आर बी ३/२०२१/६०२ , दिनांक ०७/०६/२०२१ अन्वये या कार्यालयास कळविण्यात आले आहे.


या विषयावर विचार विनिमय करुन सदर जागेवर सौंदर्याकरण प्रस्तावित करणे व त्याकरीता आवश्यक निधीची तरतूद करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सदर विषय सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता. या विषयावर सर्वांनी चर्चा करून सौंदीकरण प्रस्तावित करणे व त्याकरीता आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी मंजुरी प्रदान करण्यात आली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.