Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून ०३, २०२१

उद्याला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन






चंद्रपूर/ प्रतिनिधी

आदिवासी उपयोजन क्षे़त्रातील शाळा तुकडयांना बिगर आदिवसी क्षेत्रामध्ये रूपांतरीत करून नियमित वेतन अनुदान मंजूर करण्यात यावे व दरमहा 1 तारखेला वेतन अदा करण्यात यावे या मागणीच्या पुर्ततेसाठी कोवीड-19 साथरोगाच्या नियमाचे पालन करून शूक्रवार दिनाक 04/06/2021 ला सर्व शिक्षकांनी कुटूंबासह एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन विदर्भ माध्यमिक शिक्षक   संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांचे नेतृत्वात संपूर्ण विदर्भात करण्यात येत आहे. आंदोलनात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केले आहे.

सदर मागणीचे निवेदन मा.मुख्यमंत्री,मा.उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री, शिक्षणमंत्री यांना मा.शिक्षणाणिकारी (माध्य.) जि.प.चंद्रपूर यांचे मार्फत पाठविण्यात येत आहे. संपूर्ण राज्यातील आदिवासी उपयोजन क्षे़त्रातील शाळा/तुकडयाना 100 टक्के अनुदान देण्यात आले आहेे .  15  वर्शापेक्षा जास्त कालखंड होउनही नियमित वेतन अनुदान मंजूर होत नसल्यामूळे त्यांचे 2 ते 3 महीने वेतन होत नाही.त्यामूळे शाळेत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाÚयांना दरमहा वेतन होत नसल्यामूळे आर्थीक अडचणीचा सामना करावा लागतो त्यांचे जीवन विमा हप्ते,गृहकर्ज हप्ते,पतसंस्थेच्या कर्जाचे हप्ते नियमित भरल्या जात नसल्यामूळे व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.अनेक षिक्षकांना कोवीड-19 ची लागण झाल्यामूळे उपचारार्थ दवाखान्यात भरती व्हावे लागले नियमित वेतन होत नसल्यामूळे त्यांच्या समोर आर्थीक प्रश्न निर्माण झाला आहे. 
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येते की,तरी सदर आंदोलनत  चंद्रपूर जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष श्री.केषवराव ठाकरे,जिल्हाकार्यवाह श्रीहरी    शेंडे ,कार्याध्यक्ष लक्षमणराव धोबे, उपाध्यक्ष सुनिल शेरकी,नामदेव ठेंगणे,गंगाधर कुनघाडकर,मंजुशा धाईत, कोशाध्यक्ष दिंगाबर कुरेकर, सहकार्यवाह अनिल कंठीवार,शालिक ढोरे, नितीन जिवतोडे, सोनाली दांडेकर,  दिपक धोपटे, सल्लागार,मारोतराव अतकरे, प्रमोद कोडलकर, देवराव निब्रड, श्रीराम भोयर, संघटक, सचिन तपासे, मनोज वासाडे, रामदास आलेवार, धनंजय राउत, रंजना किन्नाके, क.म.वि.प्रमुख, ज्ञानेष्वर सोनकुसरे, प्रसिध्दी प्रमुख, प्रभाकर पारखी, आंनद चलाख यांनी   शिक्षकांना    सहभागीी होण्याचे    आवाहन केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.