Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून १८, २०२१

शिक्षकांनी कोवीडचे काम केले; मृत्यू पावल्यावर वार्‍यावर सोडले #nagpur #Education



खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे आंदोलन

अनुकंपा व विमा कवचसाठी कुटूंबाची वाताहत


कोरोना व इतर आजाराने मृत्यु पावलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर नेमणुका देणे,कोरोना योद्धा म्हणुन काम करीत असतांना मृत्यु झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विमा कवच(पन्नास लक्ष रुपये)तातडीने मंजुर करणे,शिक्षणविभागातील यांच्यातील वाढता भ्रष्टाचार,उच्च न्यायालयाचे र्निदेश असणारी प्रकरणे वरिष्ठ अधिकार्‍यांकडे मार्गदर्शनासाठी जाणुन वर्ग करणे,प्रलंबित डीसीआरजी रकमेची प्रकरणे,भविष्य र्निवाह निधीतुन अंतिम परतावा रक्कम उपलब्ध संगणक प्रणाली बंद असल्यामुळे पेंशनधारक शिक्षकांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास, शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडु यांनी दि.३० डिसेंबर २०२० रोजी शिक्षण सचिव,आयुक्त(शिक्षण),प्रत्यक्ष शिक्षण संचालक,यांचे प्रतिनिधी सोबत मान्य करण्यात आलेल्या प्रकरणावर कार्यवाही न होणे,शिक्षकेत्तर पदोन्नतीला मान्यता नाकारणे व रक्कम प्राप्त पदास मान्यता प्रदान करणे या मागण्याचे निवेदन सहाय्यक शिक्षण संचालक सतिश मेंढे यांना देण्यात आले. खासगी प्राथमिक शिक्षक संघातर्फे बुधवार १६ जुन २०२१ रोजी दुपारी २ ते ४ वाजतापर्यंत नागपूर विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालया समाेर खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने प्रमुख मार्गदर्शक श्री.प्रमाेदजी रेवतकर सर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागचे शिक्षक आमदार श्री.नागाेराव गाणार सर यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीत कोवीड -१९ सर्वेक्षण , लसीकरण मोहीम राबविण्यासाठी शासकीय कर्मचारीच्या खांद्याला खांदा लावून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी लढा दिला .या उपरांत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना काेविड याेद्धा म्हणून घाेषीत करताना शासनाची भूमिका नकारात्मक दिसून येत आहे. मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर त्याच संस्थेत नोकरी द्यायला पाहिजे तसेच त्या परिवारांना ५० लाख रुपये विमा कवच सानुग्रह अनुदान राशी शासनाने द्यायला पाहिजे अशा विविध मागण्या शासन दरबारी मांडल्या या मागण्यासंदर्भात आंदाेलन करण्यात आले. काेराेना महामारीत केवळ नागपूर विभागातीलच एकूण ६० पेक्षा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मृत पावले असून याची यादी सहीत निवेदन सहाय्यक शिक्षण संचालक सतीश मेंढे यांना दिले. या यादीचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल असे सहाय्यक शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.याही पेक्षा अधिक जास्त आकडा आहे. त्याचा शाेध घेणे सुरू आहे. असेही निवेदनातुन स्पष्ट केले.या आंदाेलनात सचिव विजय नंदनवार,रहेमततुल्ला खान,संजय बाेरगावकर,माेहन साेमकुवर, लाेकपाल चापले,गाेपाल मुऱ्हेकर, तेजराज राजुरकर,विजयआगरकर,राजकुमार शेंडे,साै.कल्पना काळबांडे,श्रीमती कुमूद बालपांडे,ज्याेती सुर्यवंशी,राजकुमार पटिये,सदानंद कुर्वे, आदी उपस्थित हाेते. या व्यतीरिक्त आपल्याकडे एखाद्या शाळेतील कर्मचारी मृत पावल्याची माहिती असेल तर या माेबाईल नंबर ८१४९९११४५९ या वर संपर्क साधा.आज एक एक कुटूंब फार माेठ्या दु:खात आहे.अशावेळी आपण एखाद्या कुटूंबाशी संपर्क साधाल त्या वेळी आपण कुणाला आर्थीक मदत करू शकत नाही .पण ही आपली अनमाेल मदत माेलाची ठरू शकते.एकमेका सहाय्य करू ,अवघे धरू सुपंथ असे लोकपाल यांनी सांगीतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.