कोरपना/चंद्रपूर :- मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर येथील वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व नियंत्रणात आज दिनांक ५ जून २०२१ जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने कोरपना तालुक्यातील ४१ गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
कोविड सारख्या परिस्थितीत देखील सुरक्षित कोविड चे नियम पळून झाडांची लागवड करण्यात आली आणि याच बिकट परिस्थितीत ऑक्सिजन च्या अभावाने झाडांचे अधिक महत्व असल्याने दिसून येत आहे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. तालुक्यामध्ये खुप मोठया सिमेंट कंपन्या देखील आहेत त्यामुळे तर अजूनच प्रदूषण वाढत आहे. हीच समस्या लक्षात घेता. वृक्षलागवड करणे गरजेचे आहेच तसेच त्या सोबत ते जगविणे देखील तेवढेच महत्वाचे आहे.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर च्या स्केल प्रकल्पा अंतर्गत १२ ते १६ या वयोगटातील मुलांना जीवन कोशल्य रुजविल्यात येतात. त्यासाठी ४ एस.एस. ओ. ३२ सी. सी. यांच्या माध्यमातून प्रत्येक सी. सी नि १० म्हणजे एकूण ३२४ झाडे लावून मुलांकडून त्यांच्या संगोपनाची शपथ घेतली आहे.आणि त्या झाडांकडे प्रत्येक महिन्याला लक्ष देखील ठेवण्यात येणार आहे.यासाठी गावातील लोकं विद्यार्थी युवक मंडळी गावातील प्रतिष्ठित आशा वर्कर अंगणवाडी सेविका सरपंच पदाधिकारी ग्रामसेवक शिक्षक यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला.
अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आमच्या गावामध्ये राबवा आमचा तुम्हला सक्रिय सहभाग असेल असे मत सरपंच व गावकऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी मॅजिक बस च्या कामाची स्तुती देखील करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रभाग समनव्यक सुपडा वानखडे शाळा सहाय्यक अधिकारी भूषण शेंडे, निखिलेश चोधरी, अब्दुल एजाज, गंगाधर जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.