आमदार सुभाषभाऊ धोटे यांना निवेदनातून मागणी
कोरपना/चंद्रपूर :-
भारत देशातच नाही तर महाराष्ट्रात सुध्दा कोरोनाने हादरवून टाकले आहे. याची सर्वात जास्त जर झळ कोणाला पोहोचली असेल तर ती म्हणजे सलून व्यवसायीक,कारागीर व नाभिक समाजाला, मानवीय अत्यंत जवळचा संबंध येत असल्याने फ्रुन्ट लाईन वर्कर मध्ये समावेश करून लसीकरणाच्या लाभ मिळवून देण्यास प्रयन्त करावे अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांना निवेदनातून केली आहे.
मागील एक वर्षापासून सतत दुकाने बंद त्यामुळे त्यांचा वर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला तर अनेकांनी ही झळ सहन न झाल्याने आत्महत्या केली.
नुकतेच लॉक डाउन खुलले असले तरी कोरोना चा भीतीने ग्राहक मात्र येण्यास धजावत नाही. विशेष म्हणजे सलून व्यवसायीक,कारागीर यांनी वेळोवेळी शासनाचे नियमाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य केले आहे. सलून व्यवसायीक,कारागीर यांचा मानवाशी थेट संबंध येत असल्याने दोघांनाही कोरोना ची लागण होणार याची भीती असते. त्यामुळे सलून व्यवसायीक,कारागीर यांना फ्रंट लाईन वर्कर घोषीत करून त्यांना प्रथम प्राधान्य देवून लसीकरनाचा लाभ मिळवून द्यावा. अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांना नांदा येथील सतीश जमदाडे यांनी निवेदनातून केली आहे.
सोबतच श्री संत नगाजी महाराज देवस्थान व हनुमान मंदिर राजुरगुडा रोड नांदा येथे स्थित असलेल्या मदिर परिसरात स्वागत गेट, तसेच दोन्हीं मंदिरा पुढे पोर्च व परिसराचा सौदर्यीकरना करता निधी उपलब्ध करून द्यावा. अशीही मागणी करण्यात आली.