Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून १३, २०२१

तहानलेल्या हत्तीवर मगरीचा हल्ला, जबड्यात पकडून पाण्यात नेण्याचा प्रयत्न, पाहा थरारक व्हिडीओ

 

तहानलेल्या हत्तीवर मगरीचा हल्ला, जबड्यात पकडून पाण्यात नेण्याचा प्रयत्न, पाहा थरारक व्हिडीओ

एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीच्या कळपावर एका मगरीने हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडीओ अतिशय थरारक आहे.

तहानलेल्या हत्तीवर मगरीचा हल्ला, जबड्यात पकडून पाण्यात नेण्याचा प्रयत्न, पाहा थरारक व्हिडीओ

जंगलातील दुनियेचं सगळ्यांनाच आकर्षण असतं. जंगलातील प्राणी कसे जगत असतील ? छोट्या प्राण्यांवर इतर प्राणी कसे हल्ला करतात ? या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. याच उत्सुकतेपोटी प्राण्यांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. सध्या असाच एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीच्या कळपावर एका मगरीने हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडीओ अतिशय थरारक आहे
व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा एका जंगलातील असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्तीचा कळप दिसतोय. यामध्ये काही छोटे तर काही मोठे हत्ती आहेत. हे सर्व हत्ती एका नदीच्या काठावर जाऊन पाणी पित आहेत. मात्र, याच वेळी या हत्तींपैकी एका छोट्या हत्तीवर पाण्यातील मगरीने हल्ला केला आहे. या मगरीने आपल्या जबड्यामध्ये हत्तीला पकडले आहे. मगर हत्तीची सोंड आपल्या जबड्यामध्ये पकडून त्याला पाण्यात खेचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हत्ती बलशाली असल्यामुळे तो मगरीला दाद देत नाहीये.



मोठा हत्ती आला अन् प्राण वाचला
हा प्रकार अचानकपणे घडल्यामुळे व्हिडीओतील हत्तींचा कळप बिथरून गेला आहे. व्हिडीओतील हत्ती मोठ्याने ओरडत असल्याचे आपल्याला दिसत आहेत. तसेच यावेळी कळपातील एक मोठा आणि समजूतदार हत्ती मगरीकडे धावून गेल्याचेही आपल्याला दिसतेय. या मोठ्या हत्तीने छोट्या हत्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न शेवटी यशस्वी झाला असून छोटा हत्ती मगरीच्या तावडीतून सुटला आहे


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.