Citizens under the age of 18 were vaccinated in Chandrapur on Wednesday | Chandrapur | Khabarbat
चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर (आरोग्य विभाग) च्या माध्यमातून बुधवार, दि. २३ जून २०२१ रोजी १८ ते ४४ वयोगटातील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण केले जाणार आहे. सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत लस घेता येईल.
१८ ते ४४ वयोगटातील केवळ पहिला डोस (कोविशिल्ड)साठी १. कन्नमवार प्राथमिक शाळा, सरकार नगर २. गजानन मंदिर, वडगांव, ३. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड, ४. डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, भानपेठ वॉर्ड, ५. सावित्रीबाई फुले शाळा, नेताजी चौक, ६. मुरलीधर बागला शाळा, बाबूपेठ, ७. मातोश्री शाळा, तुकुम येथे होईल.
केवळ दुसरा डोस (कोव्हॅक्सीन) १. एनयुएलएम ऑफिस, ज्युबिली हायस्कूलच्या समोर येथे होणार आहे. पहिला डोस ऑनलाईन आणि ऑफलाईन (टोकन) पद्धतीने लसीकरण होईल. दुसरा डोस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य, कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 84 दिवसानंतर घ्यावा, 70 वर्षावरील तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या नागरिकांना देखील प्राधान्य दिले जाईल. त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही. विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. २३ जून २०२१ रोजी ४५ वर्षावरील नागरिकांसाठी सुरू असलेली लसीकरण केंद्र पहिला आणि दुसरा डोस (कोविशिल्ड) साठी आहेत. यात १. शहरी नागरी आरोग्य केंद्र १, इंदिरा नगर, मूल रोड, २. शकुंतला लॉन १, नागपूर रोड, ३. टागोर प्राथमिक शाळा, विठ्ठल मंदिर वॉर्ड, ४. जलाराम मंदिर, एस.पी. कॉलेज जवळ, ५. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, बाबूपेठ, ६. खालसा कॉन्व्हेंट, गुरुद्वारा, महाकाली मंदिर रोड, ७. विद्या विहार शाळा, लॉ कॉलेज जवळ येथे केंद्र आहे.
पहिला आणि दुसरा डोस (कोव्हॅक्सीन) साठी १. जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर २. शासकीय आयटीआय कॉलेज, वरोरा नाका, नागपूर रोड हे दोन केंद्र नियोजित आहेत. - वरील सर्व केंद्रावर ऑनलाईन आणि ऑफलाईन (टोकन) पद्धतीने लसीकरण होईल. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस 84 दिवसानंतर घ्यावा. दुसऱ्या डोससाठी प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य राहील. 70 वर्षावरील तसेच शारीरिक दृष्ट्या अपंग असलेल्या नागरिकांना देखील प्राधान्य दिले जाईल. त्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.