दि २१ जुन २०२१ ला सायंकाळी ८च्या सुमारास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नागपुर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आकाश गजबे यांच्या बालाजी नगर कोंढाळी येथील घराच्या परीसरात ९ वर्षीय अनोळखी बालक रडत असल्याचे निदर्शनास आले. या बालकाला घेऊन ते थेट कोंढाळी पोलीस स्टेशनला घेऊन दाखल झाले. कोंढाळी पोलिस स्टेशन ठाणेदार श्री विश्वास पुल्लवार यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठीत नागरीकांच्या मदतीने आजुबाजुच्या जिल्हा व तालुक्यांमध्ये माहीती मिळविण्याच्या प्रयत्न केला असता वर्धा जिल्ह्य़ातील कारंजा तालुक्यातील राजनी गावातील १ बालक हरविल्याची माहीती प्राप्त झाली व बालकाची ओळख अवघ्या १ तासात प्राप्त होताच कोंढाळीचे ठाणेदार श्री विश्वास पुल्लवार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आकाश गजबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महासचिव नितीन ठवळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत खंते, अफसर हुसेन यांनी रात्री ताबडतोब रात्री ११च्या सुमारास वर्धा जिल्ह्य़ातील राजनी या गावात जाऊन योग्य चौकशी करुन मुलाची खात्री पटविली व त्या बालकाच्या मातेकडे मुलाला ताब्यात दिले. तिच्याकडे चौकशी केली असता तिचे नाव श्रीमती सोमी गजानन शिवरे वय ४० असे सांगीतले तर हरवलेला बालकाचे नाव कु देविलाल शिवरे असुन बालक हा तीचाच असल्याचे सांगितले. या कार्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून कोंढाळी पोलीस तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
गुरुवार, जून २४, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
डॉ.ऍड अंजली साळवे ओबीसी जनगणनेसाठी सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेतनागपूर:ओबीसीच्या जनगणनेची देशात सर्वत्र मागणी सुर
भरकोर्टात न्यायधिशानी दिला राजीनामा; कारण वाचून.... | Nagpur Justice Rohit DevNagpur Justice Rohit Dev | नागपूर खंडपीठाचे
सावधान! वीजबिलासंदर्भातील बनावट एसएमएस | MSEDCL | cybercrime (adsbygoogle = window.adsbygoogle || []).pu
दिलीप पनकुले यांची चंद्रपूर (ग्रामीण)चे निरीक्षकपदी नियुक्ती प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिटण
राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या चंद्रपूर जिल्ह्यातील या दोन जागा NCP Chandrapurराष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक श्री.दिलीप प
नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने? बैठकीत झाला हा निर्णय! Nationalist Congress Party (adsbygoogle = window.adsbygoogle || []).pu
- Blog Comments
- Facebook Comments