तुमच्या गॅस सिलेंडरची सबसिडी मिळत नसेल तर हे करा
अनेकांना गॅस सबसिडी अनुदान मिळत नाही अशी तक्रार आहे.तुमच्याही खात्यात हे अनुदान येत नसेल तर तुम्ही याबाबत तक्रार करु शकता.
यासाठी एलपीजी गॅस पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करता येते. याशिवाय टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करुनही तुम्ही तक्रार करु शकता. यासाठी तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होतेय की नाही हे तपासा.
गॅस सब्सिडी तुमच्या खात्यावर जमा होतेय की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जा. www.mylpg.in या वेबसाईटवर उजव्या बाजूलाचा फोटो (Bharat, HP, Indane) दिसेल. या ठिकाणी तुमची गॅस टाकी ज्या कंपनीची आहे तेथे क्लिक करा.
या ठिकाणी तुम्ही याआधी ही सेवा वापरली नसेल तर तुमची नोंदणी करुन खातं तयार करा. त्यानंतर लॉगिन करा. येथे उजव्या बाजूला सिलिंडर बुकिंग हिस्ट्री पाहण्याचा पर्याय आहे. तेथे क्लिक केल्यावर तुम्हाला कधी कधी किती सब्सिडी मिळाली हे दिसेल
जर तुम्हाला येथे सब्सिडी मिळाली नसल्याचं दिसलं तर फीडबॅक पर्यायावर क्लिक करुन तक्रार नोंदवा. याशिवाय टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करुनही तक्रार करता येते.जर तुम्हाला येथे सब्सिडी मिळाली नसल्याचं दिसलं तर फीडबॅक पर्यायावर क्लिक करुन तक्रार नोंदवा.