Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सबसिडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सबसिडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, जून १८, २०२१

तुमच्या गॅस सिलेंडरची सबसिडी मिळत नसेल तर हे करा

तुमच्या गॅस सिलेंडरची सबसिडी मिळत नसेल तर हे करा

 

तुमच्या गॅस सिलेंडरची सबसिडी मिळत नसेल तर हे करा 

अनेकांना गॅस सबसिडी अनुदान मिळत नाही अशी तक्रार आहे.तुमच्याही खात्यात हे अनुदान येत नसेल तर तुम्ही याबाबत तक्रार करु शकता.

गॅस सिलेंडरची सबसिडी मिळत नसेल तर


यासाठी एलपीजी गॅस पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करता येते. याशिवाय टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करुनही तुम्ही तक्रार करु शकता. यासाठी तुमच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होतेय की नाही हे तपासा.
गॅस सब्सिडी तुमच्या खात्यावर जमा होतेय की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जा. www.mylpg.in या वेबसाईटवर उजव्या बाजूलाचा फोटो (Bharat, HP, Indane) दिसेल. या ठिकाणी तुमची गॅस टाकी ज्या कंपनीची आहे तेथे क्लिक करा.
या ठिकाणी तुम्ही याआधी ही सेवा वापरली नसेल तर तुमची नोंदणी करुन खातं तयार करा. त्यानंतर लॉगिन करा. येथे उजव्या बाजूला सिलिंडर बुकिंग हिस्ट्री पाहण्याचा पर्याय आहे. तेथे क्लिक केल्यावर तुम्हाला कधी कधी किती सब्सिडी मिळाली हे दिसेल
जर तुम्हाला येथे सब्सिडी मिळाली नसल्याचं दिसलं तर फीडबॅक पर्यायावर क्लिक करुन तक्रार नोंदवा. याशिवाय टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करुनही तक्रार करता येते.जर तुम्हाला येथे सब्सिडी मिळाली नसल्याचं दिसलं तर फीडबॅक पर्यायावर क्लिक करुन तक्रार नोंदवा.