शिरीष उगे/खबरबात
भद्रावती (प्रतिनिधी) : भद्रावती नगरपालिका क्षेत्रातील घाण बरांज कडे जाणाऱ्या मार्गांवर टाकली जात असल्यामुळे त्या मार्गाने जाणे कठीण झाले असून बरांज व चिचोर्डीं येथे राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बरांज व चिचोर्डीं ला जाण्या करिता वापरत असलेल्या मार्गावर सध्या कमालीचे घाणीचे साम्राज्य साचले आहे या मार्गाचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात घाण फेकण्या करिता करत आहेत. नगरपालिका क्षेत्रात असलेले भाजी व्यवसाय करणारे आपला उर्वरित खराब झालेला भाजी पाला, सडलेली फड, मास मच्ची वीकल्या नंतर वाचलेले वेस्ट, गटार साफ केल्या नंतर निघालेली घाण, रुग्णालयातील वापरलेली इंजेकशन, कापूस निकामी औषध व इतर कचरा, मेलेली जनावर या सोबतच घरातून निघनारी सर्व प्रकारची घाण इथे फेकल्या जाते.
नगरपालिका तर्फे कचरा व्यवस्थापणे करिता मोठ्या प्रमाणात फंड वापरला जातो ज्यात घंटा गाड्या, घण कचरा प्रकल्प, सफाई कामगार व स्वच्छताच्या इतर गोष्टीचा समावेश आहे या सर्व गोष्टी असूनही या मार्गात टाकण्यात येणारी घाण मोठ्या चिंतेचा विषय बनली आहे. या मार्गावर अतिशय सुंदर नैसर्गिक वातावरण असल्या मुळे नागरिक सकाळी शुद्ध हवा घेण्या करिता मोठ्या प्रमाणात या मार्गांवर येतात परंतु या घाणी मुळे स्वछ हवा मिळण्या पेक्षा नागरिकांना नाक दाबून इथे फिरावं लागत आहे. आजू बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात काम करणे अवघड झाले आहे तर बरांज व चिचोर्डीं वासियाना नाईलाजाने या मार्गाने जावे लागत आहे. या घाणी मुळे सर्व लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाण नगरपालिका क्षेत्रातील परंतु आरोग्याची हानी मात्र बरांज व चिचोर्डीं येथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबाची होत आहे.
या संपूर्ण बाबी कडे नगरपालिका च्या संबंधित वीभागाने त्वरित लक्ष द्यावे साचलेली घाण त्वरित स्वछ करावी अन्यथा हि घाण भद्रावती च्या प्रवेश द्वारा समोर टाकण्याचा इशारा बरांज-चिचोर्डीं गावकर्यांनी दिला आहे.