Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून २७, २०२१

वेकोलि ने दत्तक घेतलेल्या कुनाडा गावाचा केला पाणीपुरवठा बंद

*गावकऱ्यांचा वेकोली प्रबंधकाच्या बंगल्या समोर ठिया . 
भद्रावती - वेकोलि मार्फत दुसऱ्यांदा पुनर्वसन केलेल्या दत्तक कुनाडा गावाचा वेकोलि ने विद्युत पुरवठा खंडित करून पाणीपुरवठा बंद केल्याने नागरिकांची पाण्यासाठी हाहाकार होत आहे. गावकऱ्यांनीच विद्युत भरणा करून पाणीपुरवठा सुरळीत करावा असा अजब फतवा वेकाली ने काढल्याने गावकऱ्या समोर चिंतेचा विषय बनला आहे. शनिवावारला गावकर्यानी वेकोली प्रबंधक एस के भैरवायांच्या बंगल्या समोर ठिया आंदोलन केले . माजरी एरियातील कुनाडा गावाचे 2006 मध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु या गावाच्या अपुऱ्या सोयीसुविधा असल्याने त्या पूर्ण करण्यासाठी पुनर्वसन समिती नेमण्यात आली. त्यानंतर वेकोलि ने गावाला दत्तक घेतले व 2010 रोजी गावाचे पुनर्वसन झाले. आता अकरा वर्षाचा काळ लोटत असला तरी वेकोली अजून पावेतो पुनर्वसन झालेल्या गावातील पट्टे सुद्धा गावकऱ्यांच्या नावावर केले नाही. आतापर्यंत वेकोलि मार्फत गावांमध्ये सोयीसुविधा व्यवस्थित चालू असताना वेकोलिचे प्रबंधक यांनी ग्रामपंचायत सचिवाला पत्रव्यवहार करून विद्युत पुरवठा खंडित करून येतील पाणी बंद करणार असल्याच्या सूचना केल्या होत्या . यावर काही नागरिकांनी प्रबंधक यांची भेट घेऊन चर्चा केली असता प्रबंधकानी गावाला पाणी पाहिजे असेल तर येणाऱ्या विद्युत बिलाचा भरणा करा असा अजब फतवा काढल्याने येथील गावकरी हतबल झाले आहे . गावकरी शनिवारला पहाटे ९ वाजल्या पासून तर वृत्त लिही पर्यत वेकोली प्रबंधकाच्या बंगल्या समोर ठिया आंदोलन करून विद्युत पूरवठा पूर्ववत चालू करून पानी पूरवठा चालू ठेवा या करीता आंदोलन केले हि समस्या प्रबंधकाने महाप्रबंधक कुसना यांच्या असल्याचे सांगून प्रकरन झटकण्याचा प्रयत्न केल्याने वेकोली ने दत्तक घेतलेल्या गावातील पाण्याची समस्या कोण सोडवणार असा प्रश्न गावकऱ्यांना समोर पडला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.