आमदार समीर मेघे यांचे प्रतिपादन
वाडीत दत्ता मेघे बाहय रुग्ण विभागाचे उदघाटन
नागपूर /अरुण कराळे (खबरबात )
कोरोना महामारीत रुग्णाचे काय हाल होतात हे मी प्रत्यक्ष जवळून बघीतले. सर्वसाधारण रुग्णही असला तरी त्याला उपचारासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. ही सर्व अडचण दुर करण्याच्या उद्देशाने सर्व रुग्णासाठी नि:शुल्क बाह्यरुग्ण अनुसंधान केंद्र स्थापन करण्यात आले.असे प्रतिपादन आमदार समीर मेघे यांनी केले.
वाडीत दत्ता मेघे मेडिकल कॉलेज आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल व अनुसंधान केंद्र अंतर्गत शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र व बाह्य रुग्ण विभागाचा लोकार्पण सोहळा आमदार समीर मेघे यांच्या हस्ते मंगळवार २२ जुन रोजी करण्यात आला . दत्ता मेघे मेडीकल कॉलेज संस्थेअंतर्गत शालिनीताई मेघे यांचा वाढदिवस मातोश्री दिवस म्हणून साजरा करीत असून याच दिवशी वाडीत शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र व बाहय रुग्ण अनुसंधान केंद्र सुरू केले आहे.शहरी आरोग्य प्रशिक्षण केंद्रामार्फत मंगळवारी स्त्रीरोग तज्ञ गुरुवारी बालरोग तज्ञ सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत उपलब्ध राहणार आहे. या केंद्रात रुग्णवाहीका रुग्णाच्या सेवेकरीता उभी राहणार असून दिलेल्या वेळेच्या इतर वेळेत वानाडोंगरीमध्ये रुग्णाला उपचारार्थ भरती केल्या जाईल अशी माहीती दत्ता मेघे मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे यांनी प्रास्ताविकते मधुन सांगीतले. गरीबांसाठी निःशुल्क दवाखाना उघडल्या बद्दल वंचीत आघाडीचे सल्लागार राजेश जंगले यांनी आमदार समीर मेघे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.प्रास्ताविक दत्ता मेघे मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. दिलीप गोडे, संचालन डॉ. संजय देशपांडे, आभार प्रदर्शन डॉ. सचिन पाटील व विशेष कार्यकारी अधिकारी सय्याजी जाधव यांनी केले.
यावेळी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, जि.प.शिक्षण व अर्थ समीती सभापती भारतीताई पाटील , पोलिस निरिक्षक राजेंद्र पाठक , पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कोडापे,सरपंच ज्योत्सनाताई नितनवरे, सरपंच प्रफुल ढोले,सतिश जिंदल , राजेश जयस्वाल,आनंदबाबू कदम, हर्षल काकडे,प्रकाश कोकाटे,केशव बांदरे , पुरुषोत्तम रागीट, भास्करराव रिनके,नरेश चरडे, प्रमोद गमे,सुजित नितनवरे ,देवराव कडू, दिनेश कोचे, गोविंदराव रोडे,कमल कनोजे,राकेश मिश्रा,गजानन रामेकर,पुरुषोत्तम लिचडे,शैलेश थोराने,संतोष केचे ,संजय अनासाने, अखिल पोहणकर,कमलाकर इंगळे,कैलास मंथापुरवार , दिलीप चौधरी,राजेश जिरापुरे,प्रकाश डवरे, रश्मी पाटील , नितीन अडसड, विजय गंथाडे, दिनेश मंत्री,ज्योती भोरकर ,सरीता यादव, कल्पना सगदेव, कांचन माने, उर्मिला चौरसीया, नंदा कदम, मंगला पडोळे , सतिश खोब्रागडे , विशाल डोंगरे, आशीष नंदागवळी, इशांत राऊत ,अक्षय तिडके, योगेश शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.