Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून १३, २०२१

नागपूर:१५ वर्षीय राजचे अपहरण करून हत्या


नागपूर/खबरबात:
अपहरण हे पैशासाठी होत असते हे आपण बघितले असेल पण नागपुरात मात्र परिवारातील एका व्यक्तीचे मुंडके छाटून whatsapp करा, नाहीतर तुमच्या मुलाला मारुन टाकीन, असा धमकीचा फोन अपहरणकर्त्याने केला.MIDC परिसरातून अपहरण झाले.आणि नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत आऊटर रिंग रोड परिसरात मुलाचा मृतदेह सापडला.

राजू पांडे या निरागस मुलाचे अपहरण करणारा 20 वर्षीय सूरज साहू हा आता नागपूर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहे.

राजुचा गुन्हा काय?

तर तो फक्त मनोज पांडे नावाच्या व्यक्तीचा पुतण्या होता. आरोपी सूरज साहूचा असा समज आणि राग होता की मनोजने त्याच्या आईचे शोषण केले. मनोजशी बदला घेण्याचा कट रचत त्याने राजुला क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले आणि आपल्या बाईकवर बसून जिथे सामना होणार आहे तिथे नेतो असे सांगत मनोजला धडा शिकविण्याचे ठरविले. अनेक दिवसांपासून त्याचे प्लॅनिंग सुरू होते. वेबसीरिज बघून त्याने असे केले असे त्याचे म्हणणे आहे.मनोजच्या मुलाचा काटा काढण्याचा विचारही त्याने केला. पण, वयाने मोठे असल्याने ते अशक्य होते. अखेर राजचे अपहरण करण्याचे ठरविले. सूरजने क्रिकेट खेळायला जाण्याच्या बहाण्याने राजला आझादनगर, एसआरपीएफ कॅम्प ग्राऊंडजवळून आपल्या दुचाकीवर घेतले. दुचाकीवरूनच हुडकेश्वर आणि कुही जवळच्या भागात फिरवले. पोलीस आता त्या भागातील cctv चेक करणार आहेत.

मनोजचे शीर कापून व्हॉट्‍सॲपवर छायाचित्र पाठव, अन्यथा राजला सोडणार नाही’, असा इशारा राजच्या घरी फोन वरून दिला. त्यानंतर अंधार पडू लागताच राजने घरी परतण्याचा आग्रह धरला. घरी गेल्यास मनोजला धडाही शिकविता येणार नाही आणि अडकू ही भीती आरोपीला सतावत होती. त्यात राजचा हट्ट वाढतच होता. त्याने आरडाओरडही सुरू केली. हुडकेश्वर हद्दीत निर्जनस्थळी संतापाच्या भरात आरोपीने दगडाने डोक्यावर फटके मारत राजचा खून केला.


चिंतेत असणारे मृतकाचे नातेवाईकांनी एमआयडीसी ठाणे गाठून पोलिसांना झाल्या प्रकाराची माहिती दिली. तातडीने पोलिस यंत्रणा कामाला लागली. तो सोनेगाव परिसरात असल्याचे लोकेशन मिळताच पोलिसांनी वर्धा मार्गावर पाळत वाढविली. काही वेळाने पुन्हा बुटीबोरीजवळ लोकेशन मिळाले. बोरखेडी नाक्याजवळ आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीची कबुली आरोपी गवसताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने खुनाची कबुली दिली. रात्रीच त्याने घटनास्थळही दाखविले. एमआयडीसी पोलिसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा नोंदवून सूरजला अटक केली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.