Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून ०४, २०२१

धक्कादायक :नागपुरात चाकू आणि बंदुकीच्या धाकावर बांधकाम व्यावसायिकाला मागितली ५० लाखाची खंडणी :संपूर्ण परिवाराला केले होते बंधिस्त

नागपूर (ललित लांजेवार):
नागपुरात खंडणीची गुन्हे थांबता थांबेना. नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पिपला फाटा परिसरात एका बांधकाम व्यवसायिकाला एका आरोपीने ५० लाखाची खंडणी मागितली इतकेच नाही तर बांधकाम व्यवसायिकाच्या घरात घुसून संपूर्ण परिवाराला बंदिस्त बनवून ठेल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

      घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला आणि त्या बंधिस्त कुटुंबाला सुखरूप सोडवण्याच्या हालचाली सुरु झाल्या. पोलिसांनी तात्काळ QRT टीम सह अन्य पोलीस दलातील चमूला घटनास्थळी बोलावले. परिसरातील नारिकांना नेमके काय झाले हेच कळेना.

राजू वैद्य हे नागपुरातील मोठे बांधकाम व्यासायिक असल्याचे बोलल्या जात आहे. आपल्या परिवाराला काही होऊ नये यासाठी बांधकाम व्यावसायिक वैद्य यांनी किडण्यापरला ३ टप्यात २-२ लाख दिले मात्र आरोपीची हाव संपली नाही, आरोपीने आणखी पैश्याची मागणी केली. दोनमजली घरात ग्राउंड फ्लोरला ३ महिलांना तर फस्टफ्लोर वरील १ महिला आणि २ लहान मुलांना किडन्यापार ने  बंधिस्त केले होते. पोलीस बाहेरून किडण्यापर सोबत सतत संपर्कात होती.पोलिसांनी शिताफीने घरात असलेल्या पहिल्या माळ्यावरील मुले व महिलांची सुटका केली आणि त्यानंतर तळमजल्यावरील महिलांची सुटका केली.आणि आरोपीला ताब्यात घेतले. यासाठी पोलिसांनी कागदावर संपूर्ण घरचा नकाशा समजून घेतला.नंतर घराला घेराव घालत बंदिस्त परिवाराची सुटका केली आणि आरोपीला मोठ्या शिताफीने पकडले. बिल्डरने दिलेले ६ लाख रुपये देखील पोलिसांनी आरोपीकडून जप्त केले,


आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले व चौकशीसाठी नेण्यात आले. घरात बंधिस्त असलेल्या महिला व मुलांनी फोनवरून किडन्याप असल्याची माहिती पोलिसांना दिली होती व पोलिसांचा संपूर्ण फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. या संपूर्ण प्रकरणात आरोपीने कोणाला इजा पोहचवली नाही, आरोपी हातात लागताच पोलिसाने त्याला अटक करत पुढील तपासाठी कोठळीत नेले व त्याने असे का केले असावे याचा शोध पोलीस घेत आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली. तर हुडकेश्वर रोड वरील वाहतूक देखील काही वेळ बंद ठेवण्यात आली होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.