#कोविड नंतर आमदाराचा झंझावती दौरा
शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा तालुक्यातील वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कोविड नंतर लगेच विकास कामासाठी कंबर कसली आहे. गुरुवारी सकाळपासून विविध रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले.
जिल्हा खनिज प्रतिष्ठान ,ग्राम विकास योजना , व खासदार आणि आमदार विकास निधीतून तालुक्यातील विविध गावातील पांदन रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. याच निमित्ताने भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. आमदारांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून रखडलेल्या कामाची विचारपूस अधिकाऱ्यांना केल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले. गावातील महिलांनी सुद्धा आमदारांना आपल्या विविध मागण्यासाठी निवेदन सादर केले.
शेतकऱ्यांना शेती पर्यंत जाण्यासाठी पांदन रस्त्याची आवश्यकता लक्षात घेता त्यांच्या शेती पर्यंत रस्ता पोहोचवण्याचे काम आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी युद्ध स्तरावर हाती घेतले आहे. गुरुवारी एकाच दिवशी ९८ लाखाच्या विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पाडला. त्यांच्या कार्यासाठी अनेक शेतकरी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या त्यांच्या दौऱ्यामध्ये आमदार प्रतिभाताई धानोरकर सह पीडब्ल्यूडी चे उपअभियंता बावनकुळे, बिडिओ वानखेडे , पंचायत समिती सभापती धोपटे, प्रमोद मगरे, विशाल बद्खल, चेतना शेटे, मिलिंद भोयर, उपसभापती पंचायत समिती संजीवनी भोयर, विकास डांगरे, प्रवीण काकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.