कोरोना बाधित निष्पाप जीव वाचविण्यासाठी उपोषण
राजुरा- सद्या राज्य कोरोणाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. पहिल्या लाटेपेक्षा भयावह स्थिती निर्माण झाली आहे. संकट समोर येणार म्हणून शासन व प्रशासनाने उपाययोजना न करता हातावर हात धरूण बसून राहीले. आणि आता मात्र केविलवाणी धडपड करीत असतांना दिसून येत आहे. शासन व प्रशासनाने वेळीच उपाययोजना केली असती तर कोरोणाने निष्पाप जीव गमविले नसते असे मत व्यक्त करीत राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राजुरा उपजिल्हा रूग्णालयात पुरेसे व्हेटीलेटर्स बेड, 100 ऑक्सीजन युक्त बेड आणि विधानसभा क्षेत्रातील नागरीकांकरीता जंबो कोविड रूग्णालय उभारण्यात यावे अशा मागण्या घेऊन उद्या (दि.5) सकाळी पासून राजुरा उपजिल्हा रूग्णालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. प्रशासनाचा हलगर्जीपणा एका माजी आमदाराला उपोषणास बसण्यास भाग पाडत असून त्यांनी केलेल्या मागण्या रास्त असून प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी अशी मागणी करीत कोरोणाकाळात रूग्णांची गौरसोय होण्यास आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार कारणीभूत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात कोरोणाचे मोठे रूग्ण आढळून येत आहे. त्यांच्या उपचारासाठी पुरेशी आरोग्य सेवा उपलब्ध नाही. राजुरा येथील कोविड रूग्णालयात एकूण 46 बेड असून त्यापौकी केवळ 23 बेड हे ऑक्सीजयुक्त आहेत. कोरोणा रूग्णांना व्हेंटीलेटरची आवश्यकता असते परंतू याठीकाणी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गौरसोय होत असून रूग्णांचा मृत्यूही होत आहे.
राजुरा व कोरपना तालुक्यात असलेल्या अंबूजा, मानिकगड व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी व कोळसा खाण उद्योगाच्या सामाजिक दायित्व निधी अंतर्गत परिसरात असलेल्या मोठ-मोठ्या मंगल कार्यालयात जंबो कोविड रूग्णालयाची निर्मिती करण्यात येऊन राजुरा उपजिल्हा रूग्णालयात व्हेंटीलेटर सह 100 ऑक्सीजन बेडची संख्या वाढविण्याची मागणी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर केली असून मागण्या पूर्ण करण्यासाठी 5 मे पासून उपजिल्हा रूग्णालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
सुदर्शन निमकरांच्या उपोषणाची माजी कॅबिनेट मंत्री, विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेत राज्याच्या मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य विभागासह संबंधीतांना राजुरा उपजिल्हा रूग्णालयातील समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असून प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर खंत व्यक्त केली आहे.