Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ३१, २०२१

कॉंग्रेस आंदोलनकर्त्यां विरोधात गुन्हे दाखल करा : भाजयुमोची मागणी




आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे काल देवडिया कॉंग्रेस भवन येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यापासून कॉंग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) यांच्यासह दोन पोलिसांना जळाल्यामुळे जखम झाल्याची आम्हाला माहीती मिळाली, या विषयाला धरून आज नागपुरचे पोलीस अयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन देण्यात आले.

पीएसआय प्रल्हाद शिंदे आणि कॉन्स्टेबल दादाजी जांभूळकर हे जखमी झालेत. आंदोलन करणं किंव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या करता आमचे काही म्हणणे नाही पण प्रत्येकांनी आपल्या पद्धतीने विचार व्यक्त करायलाच पाहीजे. पण काल जेव्हा आंदोलन करत असतांना त्यांनी एकतर लॅाकडाऊन लागलेले असतांना लॅाकडाऊचे उल्लंघन केले. लोकांना मोठ्या प्रमाणात गोळा केले. त्यांना अवैधरित्या पेट्रोल आणि पोस्टर आणले व जेव्हा पोस्टरवर पेट्रोल टाकत असतांना पोलीसांच्या अंगावरही ते पेट्रोल टाकण्यात आले आणि स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात पोलीसांना गंभीर इजा झाली. पोलीस बांधवांची तब्येत गंभीर असुन ते रुग्णालयात दाखल आहेत. सरळपणे या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले असल्यांमुळे कलम ३०७ अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि दोषीं विरोधात अतिशय कडक अशी कारवाही करावी अशी विनंती या वेळेस करण्यात आली . सदर आंदोलनाला प्रमुख्याने कॉंग्रेसचे आमदार व नगरसेवकांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे यांच्यावर त्वरित कारवाही व्हावी व

यासोबतच पोलीस जेव्हा ते बॅनर घेत होते झटापट सुरू होती तेव्हा पोलीसांना मारहाण करण्याचं देखील काम यांनी केलं. त्यामुळे कलम ३५३ अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात यावा ही देखील विनंती या वेळेस करण्यात आली.

जे आमचे रक्षक आहेत, जे आमची रक्षा करतात त्यांच्या सोबत इतकी वाईट वागणुक कॉंग्रेसच्या नेत्यांनी फक्त केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी केली, आपलं म्हणण खरं करून घेण्यासाठी केली, स्वता:ला वाचविण्यासाठी केली हा पोलीसांचा अपमान आहे. भाजयुमो हे कदापी सहन करून घेणार नाही. ह्या कृत्याबद्दल त्यांनी पोलीसांची आणि जनतेची माफी मागावी ही आमची मागणी भाजयुमो तर्फे ठेवण्यात आली.

भाजयुमोच्या पदाधिकार्यांनी यावेळी आयुक्तांना विनंती केली की वर नमुद करण्यांत आलेले ३-४ नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात कलम ३०७,३५३ आणि १८८ अंतर्गत गुन्हे दाखल करावे आणि कडक कारवाही करावी अन्यथा युवा मोर्चा आक्रामक भुमिका घेईल.

पोलीसांसोबत अशी अमानुश वागणुक युवा मोर्चा कधी ही सहन करणार नाही, असा इशारा यावेळी भाजयुमोतर्फे देण्यात आला.

आजचे निवेदन भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात देण्यात आले. सोबत मंडळ अध्यक्ष यश सातपुते, अमर धरमारे, पंकज सोनकर, बादल राऊत, करण यादव प्रामुख्याने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.