Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे ०४, २०२१

नवेगावबांध येथे गृहभेट आपुलकीची मोहीम संपन्न

 नवेगावबांध येथे गृहभेट आपुलकीची मोहीम संपन्न 

संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विविध योजनांचे 36 अर्ज प्राप्त




संजीव बडोले,प्रतिनिधी. 


नवेगावबांध दि.४ मे:-


येथे ३ मेला ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ११.०० वाजे पासून शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमा अंतर्गत गृहभेट आपुलकी ची ही  मोहीम राबविण्यात आली.यात संजय गांधी निराधार योजनेतील विविध योजनांचे लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले आहे. सकाळी ११.०० वाजता गावातील लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रासह आपले अर्ज दाखल केले.यावेळी नायब तहसिलदार एन. के.वाढई, ग्रामपंचायतीचे सरपंच अनिरुद्ध शहारे,उपसरपंच रघुनाथ लांजेवार, ग्रामविकास अधिकारी परशुराम चव्हाण व तलाठी पुंडलिक कुंभरे तसेच तलाठी,ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत गृहभेट आपुलकीची या योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजनांचे लाभार्थ्यांचे अर्ज या मोहिमेअंतर्गत भरून घेण्यात आले. 80 पात्र लाभार्थ्यांना पैकी 36 लाभार्थ्यांचे अर्ज आज प्राप्त झाले, तर उर्वरित लाभार्थ्यांचे अर्ज उद्या दिनांक चार मेला येथील तलाठी कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत. अशी माहिती तलाठी पुंडलिक कुंभरे यांनी दिली . संजय गांधी निराधार  योजने अंतर्गत विविध योजनेचे,पात्र लाभार्थी तालुक्यात अनेक आहेत. परंतु या योजनेविषयी माहिती नाही किंवा ते खूप गरीब आहेत. सध्या कोरोना काळात वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे लाभार्थी हे तहसील कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाही.अशा लाभार्थ्यां- -करता शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तलाठी कार्यालया अंतर्गत तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीमध्ये ३ मे ते ८ मे या कालावधीत हा उपक्रम राबविला जात आहे. आज( दि.३मे ) तालुक्यातील नवेगावबांधसह, निमगाव,झाशीनगर, केशोरी,कोरंभीटोला,गौरनगर या ग्रामपंचायत व तलाठी साझ्यात ही मोहीम राबविण्यात आली.आजच्या उपक्रमात तहसील कार्यालय अर्जुनी मोरचे तहसीलदार विनोद मेश्राम, नायब तहसीलदार के. एन. वाढई, भानारकर, मुनेश्वर गेडाम, मनीषा देशमुख व अव्वल कारकून आशा तागडे, लुचे, रीता गजभिये व स्थानिक तलाठी व स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी यांनी सेवा दिली.८ मे पर्यंत ही मोहीम तालुक्यात राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील गरीब व गरजू लाभार्थ्यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग दर्शवून, ही मोहीम यशस्वी करावी. तसेचसंजय गांधी निराधार योजने अंतर्गत विविध योजनांचे आपले अर्ज भरून लाभ घ्यावा. असे आवाहन अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.