Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मे ०४, २०२१

महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनाही ‘कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करा

 महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनाही कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करा


अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना मागणी



                   संपूर्ण विश्व आज कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने ग्रसित असून रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहे. यामुळे लाखो लोकांचे बळी गेले आहेत. सर्वात जास्त झळ ही महाराष्ट्राला बसली असूनशासन मोठ्या प्रमाणात त्यासाठी अहोरात्र उपाययोजना करीत आहे. या लॉकडाऊनच्या कार्यकाळात आपल्या देशातील आरोग्य कर्मचारीडॉक्टरपरिचारिकापोलीस बांधवसरकारी कर्मचारी आणि मीडिया कर्मचारी हे कोरोना योद्धासारखे कार्य करीत आहेत. मात्रयामध्ये मीडिया कर्मचाऱ्यांना पाहिजे ते स्थान देण्यात येत नाही. घरबसल्या देशातील कोट्यवधी जनतेला खरी माहिती प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातूनच मिळत आहे. त्यामुळे आपल्या जिवाशी खेळून या खऱ्या बातम्या एकत्रित करून त्या लोकांपर्यंत पोहचविणाऱ्या पश्चिम बंगाल व मध्यप्रदेश शासनाने तेथील पत्रकारांना कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांना सुध्दा कोरोना योद्धा म्हणून घोषित करावे असे मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्राद्वारे केलेली आहे.

सोशल मीडियातून जरी लोकांना देशात आणि जगात काय चालले आहे हे समजत असले तरी खऱ्या बातम्या वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून लोकांना मिळत आहेत. मात्रया महत्त्वाच्या बातम्यांसाठी देशातील असंख्य पत्रकारवार्ताहरवृत्तपत्राचे प्रतिनिधीउपसंपादकसंपादक मंडळवरिष्ठ संपादक मंडळ आणि तंत्रज्ञ अपार कष्ट घेत आहेत. अचूक व निष्पक्ष बातमी मिळविण्याकरिता सतत प्रवास व कोरोना बाधित क्षेत्रातून पत्रकारिता करावी लागतात. आपल्या कुटुंबीयांसोबत न राहता अशावेळी देशाच्या सेवेसाठी आणि देशवासीयांना योग्य अचूक माहिती देण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. आपले कर्तव्य पार पडतांना  काही पत्रकारांना कोरोना विषाणूची बाधा होऊन ते मृत्युमुखी पडेल आहे. असेही या पत्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.  

कोरोनाच्या संकटामध्येही सर्वच क्षेत्रातील पत्रकार 24 तास कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या मेहनतीला बळ मिळावे आणि त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी आणखी शक्ती मिळावी यासाठी या महाराष्ट्र राज्यातील सर्वच पत्रकारांना कोरोना योद्धा’ म्हणून घोषित करून कोरोना योद्ध्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा पत्रकार बंधूंना लागू कराव्यात अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेली आहे. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.