संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक बातमी
काॅंग्रेसचे तरूण नेते, खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले.
राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून बरं वाटत नव्हतं. कोविडची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी करून घेतली. २२ एप्रिल रोजी या चाचणीचा अहवाल आला होता. त्यात सातव यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २३ एप्रिल रोजी ते जहांगीर रुग्णालयात दाखल झाले.
उपचारानंतर त्यांची प्रकृती उत्तम होती मात्र, २५ एप्रिलला त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे तातडीने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होतं.यातच आज निधन झाले.
राजीव शंकरराव सातव ( जन्म- सप्टेंबर २१, इ.स. १९७४) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातील राजकारणी आहेत. सातव २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या हिंगोली मतदारसंघातून निवडून गेले.
45 वर्षीय राजीव सातव हे सध्या कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्याकडे सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचं गुजरात प्रभारी पद आहे. तसंच काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे ते निमंत्रक आहेत. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार आणि राज्यसभेच्या खासदार होत्या.
राजीव सातव यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी लाटेतही विजय मिळवण्याची कामगिरी केली होती. त्यांनी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पराभूत केलं होतं.