मंगेश दाढे,
नागपूर : कोरोना रुग्ण संख्या कमी होताच शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून येत आहे. मागील तीन दिवसांपासून बड्या कंपन्यांचे आर्थिक निकाल घोषित झाले आणि कोरोना रुग्ण संख्या घसरल्याने अनेक शेअर्समध्ये तेजी आहे. आज मंगळवारी निफ्टी 15119, सेन्सक्स 50244 आणि निफ्टी बँक 34003 अंकावर कामकाज करीत आहे. आज सकाळपासून हिरव्या रंगात असलेले तिन्ही निर्देशांक तेजीत आहेत. शेअर्सकडे डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी आज सकाळीच खरेदीचा सपाटा लावला आहे.
फार्मा, बँकेकडे लक्ष
गुंतवणूकदारांनी बँकिंग क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु ठेवला आहे. तर, फार्मा कंपन्या आणि मेटल कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी आहे. कोरोनामध्ये औषधांची विक्री वाढलेली आहे. त्यामुळे फार्मा शेअर्समध्ये तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. बँकिंग क्षेत्रात होणारे आधुनिकीकरण आणि डिजिटललायझेशनचा प्रभाव शेअरवर दिसतोय.
.....