खासदार कृपाल तुमाने
वाडीत युवासेनेच्या प्रयत्नाने स्व. मासाहेब मिनाताई ठाकरे कोविड हॉस्पीटलचे लोकार्पण
वाडीतील रुग्णासाठी २५ टक्के बेड आरक्षित
नागपूर /अरुण कराळे (खबरबात)
कोरोना रुग्णाची संख्या अतिशय वेगाने वाढत असून शासकीय आरोग्य यंत्रणाही कोलमडून पडली आहे. उपचारासाठी बेड,ऑक्सिजन, डॉक्टर्स, औषधीसाठी गरिबांसोबत श्रीमंतही भटकत आहे.अशा संकटमय प्रसंगी युवासेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल काकडे यांच्या पुढाकाराने वाडीत ४५ बेडचे सुविधायुक्त कोविड उपचार रुग्णालय तीव्र गतीने निर्माण करून प्रारंभ करणे ही प्रशंसनीय बाब असून हीच खरी समाजसेवा असून संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे हीच आपली भारतीय संस्कृती आहे.असे प्रतिपादन कृपाल तुमाने यांनी केले.
शिवसेना, युवासेना यांच्या सहकार्याने वाडी पोलीस स्टेशन समोर नक्षत्र हॉस्पीटलच्या इमारतीत स्व. मॉसाहेब मिनाताई बाळासाहेब ठाकरे कोविड हॉस्पीटलचे उदघाटन महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पर्वावर शनिवार १ मे रोजी खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते डॉ.हदयनाथ मार्कंड , शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे ,युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल काकडे, शिवसेना विधानसभा संघटक संतोष केचे ,तालुका प्रमुख संजय अनासाने , उपतालुका प्रमुख रुपेश झाडे, शहरप्रमुख मधु माणके पाटील ,युवासेना हिंगणा विधानसभा संघटक विजय मिश्रा,युवासेना जिल्हा सरचिटणीस कपील भलमे, युवासेना तालुका प्रमुख अखिल पोहणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
जिल्हाधिकारी राजेंद्र ठाकरे यांच्या परवानगी नुसार सध्या ४५ खाटाचे कोवीड केंद्र सुरू झाले असून या पैकी पहिल्या फेरीत २५ बेड उपचार प्रक्रियेसाठी तयार आहे.सर्वच बेड ऑक्सिजन युक्त असून सहा सेमी व्हेंटिलेटर्स व क्षमतेच्या बेड पैकी ७५ टक्के बेड हे व्यवसाईक दर तर २५ टक्के बेड हे वाडी परिसरातील गरीब व आर्थिक दृष्टया सक्षम नसलेल्या साठी राखीव असून डॉक्टर्स नर्स सेवा, बेड,ऑक्सिजन,औषधोचार,तपासण्यासाठी फक्त ऐकून बिलाच्या २० ते २५ टक्के शुल्कच सामाजिक सेवेच्या दृष्टिकोनातून घेण्यात येणार असल्याची माहिती स्व . मॉसाहेब मीनाताई ठाकरे कोविड हॉस्पीटलचे संचालक तथा युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे यांनी दिली.
शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र हरणे यांनी आवश्यक व सामाजिक उपक्रमाबद्दल युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल काकडे व युवासेना पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी युवासेना शहर प्रमुख सचिन बोंबले, समन्वयक शुभम डवरे, प्रफुल भलमे, भूषण गिरीपुंजे,विलास भोंगळे,क्रांतिसिंग, मोहित कोठे, नरेश मसराम, कैलाश मालोदे ,अमित चौधरी, संदिप विधळे , रंजित सोनसरे,विनीत गजभिये,लोकेश जगताप,यश नागदेवे,सुजल बनसोडे,निलेश सिरसवार,रजत खेडेकर, बंडुजी तिडके , आशीष पाचघरे , अनंत भारसाकळे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन स्व . मॉसाहेब मीनाताई ठाकरे कोविड हॉस्पीटलचे संचालक तथा युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे यांनी केले.