Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ०३, २०२१

आयुध निर्माणी डिफेन्स फॅक्टरीमध्ये १५ टक्के कर्मचाऱ्यांना प्रवेश दया


आयुध निर्माणी डिफेन्स फॅक्टरीमध्ये १५ टक्के कर्मचाऱ्यांना प्रवेश दया
आयुध निर्माणी संयुक्त संघर्ष समितीचे खा. कृपाल तुमाने यांना निवेदन
नागपूर /अरुण कराळे (खबरबात )
महाराष्ट्रात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने कडक संचारबंदी लावली आहे. या आदेशाची अवहेलना आयुध निर्माणी फॅक्टरी मध्ये सुरू आहे. आयुध निर्माणी फॅक्टरी १०० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थित सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आयुध निर्माणी डिफेन्स फॅक्टरीमध्ये १५ टक्के कर्मचाऱ्यांना प्रवेश दयावे अशा आशयाचे निवेदन शनिवार १ मे रोजी खासदार कृपाल तुमाने यांना आयुध निर्माणी संयुक्त संघर्ष समितीचे पदाधिकारी सुनीत त्रिपाठी , विनोदकुमार, महाविर सिंह व्यास , वेदप्रकाशसिंह ,आशीष पाचघरे,बंडु तिडके, अनंत भारसाकळे, शुद्धोधन मेश्राम यांनी दिले.
आयुध निर्माणी अंबाझरी फॅक्टरी वाडी परिसरात असून या फॅक्टरीमधील आयुध निर्माणी वसाहती मधील रहिवाशी कामगारांची संख्या ६० ते ६५ टक्के आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलवत आहे. आजपर्यंत फॅक्टरीमधील २४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २०० नागरीकांच्या वर कर्मचारी कोरोना बाधीत झाले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत आयुध निर्माणी अस्थायी स्वरुपात बंद करावे. सध्या आयुध निर्माणी अंबाझरी मध्ये अत्यावश्यक उत्पादन सुद्धा चालू नाही आहे त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांना कामापासून वंचित ठेवावे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. या विषयी सक्षम अधिकारी यांच्या सोबत चर्चा करून हा गंभीर प्रश्न निकाली लावावा असेही . निवेदनातुन स्पष्ट केले . या निवेदनाची प्रतिलिपी महाप्रबंधक आयुध निर्माणी अंबाझरी यांना दिली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.