राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्याध्यक्ष राजूभाऊ राऊत यांची मागणी
उमरेड विधानसभाअंतर्गत भिवापुर,उमरेड,कुही या तीनही तालुक्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे व विधानसभा अंतर्गत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर नसल्यामुळे मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना नागपूर मध्ये जाऊन भरती होण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उमरेड विधानसभाअंतर्गत उमरेड येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उभारण्यात यावे तसेच विधानसभाअंतर्गत ग्रामीण रुग्णालय भिवापुर,उमरेड,कुही येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात यावी अशी विनंती राज्याचे आरोग्य मंत्री श्री.राजेश भैया टोपे साहेब यांना निवेदनामार्फत व तसेच ना.जयंत पाटील साहेब,ना.राजेश टोपे साहेब,ना.राजेंद्र शिंगणे साहेब यांच्यासोबत झालेल्या झूम मीटिंग मध्ये करण्यात आलेली आहे.तसेच सदर मागण्यांसंदर्भात राजूभाऊ राऊत जिल्हा कार्याध्यक्ष यांचे मार्गदर्शनामध्ये शेखर शेटे,डॉ.राहुल राऊत,आशुतोष बोरीकर यांनी तहसीलदार,भिवापूर यांना निवेदन दिले आहे.
या आधी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमरेड विधानसभा अंतर्गत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या HRCT निदानासाठी सिटी स्कॅन मशिन आवश्यक मनुष्यबळ व आवश्यक परवानगीसह देण्यासंदर्भात सुद्धा निवेदनामार्फत विनंती करण्यात आलेली आहे.