नविदिल्ली : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर आज बुधवारी सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्र सरकारला धक्का बसला आहे. राज्य सरकारने तयार केलेला मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्दबादल केला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नाझीऱ, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल दिला आहे. या निकालाचे दूरगामी परिणाम आगामी काळात दिसू शकतात.
पुन्हा आव्हान?
राज्य सरकार या निकालानंतर कोणता निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुन्हा निकालाला आव्हान दिले जाणार की कायदात बदल करणार, यावर आता राजकीय व सामाजिक घटकाचे लक्ष असेल.
मराठा आरक्षण रद्द करत असल्याचे सुप्रीम कोर्टाने आज सांगितले. मराठा समाजासाठी आजचा निकाल दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाचे न भरून येणारे नुकसान झालेले आहे.
- छत्रपती संभाजी
खासदार