Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मे १६, २०२१

बी डी एस प्रणाली बंद असल्यामुळे देयके अडले




एक तारखेला वेतन जमा करण्याची मागणी

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे निवेदन...


चंद्रपूर- माध्यमिक तसेच जिल्हा परिषद व महा नगरपालिका व नगरपालिका शाळांमध्ये शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचांचे वेतन व भत्ते शालार्थ या ऑनलाईन प्रणालीव्दारे अदा केल्या जाते व दरमहा १ तारखेला वेतन देण्याचे स्पष्ट निर्देश असतांना मार्च २०२१ चे बऱ्याच शाळांचे व एप्रिल २०२१ चे सर्व शाळांचे वेतन अजुनही झालेले नाही . त्यामुळे शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोविड -१ ९ मुळे लॉकडाऊन व संचारबंदी कालावधी मध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे . तसेच बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे  देयके प्रलंबित आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला करण्यात यावे व बीडीएस प्रणाली तात्काळ सुरू करावी अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी केलेली आहे .


याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना ई-मेल द्वारे पत्र पाठवून  वेतन महिन्याच्या एक तारखेला देण्यात यावे व बी डी एस प्रणाली सुरू करण्याबाबत विनंती केलेली आहे .

वेतन उशिरा झाल्यामुळे विम्याचे हप्ते , गृह कर्जाचे हप्ते , कर्मचारी पतसंस्थांचे हप्ते उशिरा भरल्या जात असल्यामुळे व्याजाचा भुरदंड सहन करावा लागत आहे .  शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दरमहा १ तारखेला वेतन अदा करण्याच्या संदर्भाने उचित कार्यवाही करण्यात यावी . तसेच  थकीत देयके / मेडीकल / अर्जीत रजा / भविष्य निर्वाह निधी परतावा नापरतावा देयके मंजुरकरण्या संदर्भाने विकसित करण्यात आलेली BDS प्रणाली बंद असल्यामुळे शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सदर देयके प्रलंबित आहे .  सदर BDS प्रणाली तात्काळ सुरू करूण प्रलबित देयके तात्काळ मंजूर करण्यात यावी . तसेच नियमित देयके मंजूर करतांना कोषागार कार्यालय अनुदान वितरणाची शाईची प्रत प्राप्त झाल्याशिवाय देयके मंजूर करीत नाही . ऑनलाइनच्या युगात शाईची प्रत येईपर्यंत देयके मंजूर होत नाही त्यामुळे वेतनास विलंब होतो. ही विसंगती दूर करावी. त्या संदर्भाने योग्य निर्णय घेऊन तात्काळ देयके मंजूर करण्यात यावी . अशी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.