खासदारांच्या दौऱ्यानंतर आरोग्य व्यवस्था लागली कामाला
खासदार बाळू धानोरकर यांच्या सूचनांची प्रशासनाकडून दखल
चंद्रपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. चंद्रपूर शहरातील आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्याकरिता ग्रामीण यंत्रणा अधिक प्रभावी करण्याकरिता प्रत्यक्ष खासदार बाळू धानोरकर यांनी तालुका स्तरावरील कोरोना सेंटरवर भेट देत लोकहितकारी सूचना त्यांनी तालुका प्रशासनाला दिल्या. त्यानुसार दखल घेत आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान करण्याकरिता पाऊले उचलत आहे.
राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, पोंभुर्णा, मूल, कोठारी, गोंडपिपरी या ठिकाणी खासदार बाळू धानोरकर यांनी भेटी दिल्या. जिवती तालुका हे चंद्रपूर चे शेवटचे टोक आहे. आरोग्य सेवा अपुरी पडता काम नये याकरिता खासदार बाळू धानोरकर यांनी आय. टी. आय येथे कोविड सेंटर उभारण्याच्या सूचना दिल्या होत्या. ते आज कार्यान्वित करण्यात आले असून आज तेथे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यासोबतच येथे शववाहिका व जनरेटरची सोय लवकरच उपलब्ध होणार आहे. पोंभुर्णा येथे देखील कोरोना संबंधी असलेल्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालय च्या नवीन इमारतीमध्ये ऑक्सिजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच २० बेड करीता सेंट्रल पाईपलाईन टाकण्याच्या सूचना केल्या होत्या. ते देखील काम अंतिम टप्प्यात आहे. मूल येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून आली. खासदार बाळू धानोरकर यांनी याबाबत गंभीर नाराजी दर्शवली. प्रशासनाने दखल घेत आता नियमित स्वच्छता करीत आहे. कोठारी, बामणी, विसापूर येथे २९ तारखेपासून लसीकरण केंद्र बंद होते. भेटी दरम्यान ही बाब निदर्शनास येताच ते केंद्र कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आता हि केंद्र कार्यान्वित करण्यात आली असून तेथे लसीकरण सुरु झाले आहे. राजुरा येथे पौस्टिक आहार देण्यात यावे त्यात अंडी देण्याच्या सूचना दिल्या. या सर्व सूचनांचे पालन करण्यात येत असून सूचना नुसार उपायोजना करण्यात येत आहे.
खासदार बाळू धानोरकर हे नेहमीच शेवटच्या वर्गाच्या विचार करून जमिनीवर काम करणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. ते आज देखील त्यांच्या कृतीतून आपल्याला दिसून येते. कोरोना सेंडर्स मध्ये देखील ते पीपीई किट्स लावून रुग्णाची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना विचारतात. त्यासोबत तिथे दिसणाऱ्या उणीवा प्रशासनाशी समन्वय ठेऊन पूर्ण करतात.