चंद्रपूर/खबरबात
५० हजारांच्या लाचेची मागणी करून १०,००० हजार रुपायांची लाच घेतल्याप्रकरणी नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग,सहाय्यक संचालक,नगर रचना शाखा कार्यालय चंद्रपूर येथील सहाय्यक नगर रचनाकार अनिल श्रावण चहांदे यांना रंगेहात अटक करण्यात आली.
तक्रारदार हे भद्रावती जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून, तक्रारदार मौजा टाकळी येथे सर्व्हे नंबर ८० / 2 / अ / २ आरजी १.०१ हे.आर हॉटेल व रेस्टॉरंट परवानगी करीता नाहरकत कामाकरीता नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभाग,सहाय्यक संचालक,नगर रचना शाखा कार्यालय चंद्रपूर येथे अर्ज केला. हे काम करून देण्यासाठी सहाय्यक नगर रचनाकार अनिल श्रावण चहांदे यांनी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविरुध्द तक्रार केली. कार्यवाही करीता दिनांक २७.०५.२०२१ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी कार्यवाही दरम्याण १००००/-रु. लाचेची मागणी स्पष्ट झाली. याचसोबत उर्वरित रक्कम देण्याचे ठरले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत पैसे घेताना रंगेहाथ अटक केली.
सदरची कार्यवाही ही श्रीमती रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्रवि.नागपुर, श्री. मिलिंद तोतरे, अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नागपूर, यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक श्री-अविनाश भामरे पोहवा.मनोहर एकोणकर नापोकॉ.संतोष येलपूलवार, अजय बागेसर, संदेश वाघमारे,रोशन चांदेंकर,नरेश नन्नावरे मपोकॉ समिक्षा ढेगळे व चालक पोका सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली.