चिचगड पोलिसांची कारवाई 90 हजार रुपयाची देशी दारू जप्त
एकूण 4 लाख 90 हजार रुपयाचा ऐवज जप्त
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.8 मे:-
गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस स्टेशन येथील स्टाफसह पोलीस स्टेशन परिसरात अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी आज दि.7 मे ला पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय बातमीदाराकडून दोन चारचाकी वाहने हे देशी दारू छत्तीसगड राज्यात नेत असल्याची माहिती मिळाली. तेव्हाची पोलिसांनी मौजा कुणबीटोला टी पॉईंट जवळ नाकाबंदी केली असता,ककोडी या गावावरून एक पांढर्या रंगाची चार चाकी वाहन पोलिसांना दिसले. सदर वाहनास थांबवुन चालकास त्याचे नाव,गाव विचारले असता, त्याने आपले नाव धर्मेंद्र रूपराम निषाद वय 34 वर्षे राहणार पिनकपार जिल्हा बालोद चालका शेजारी बसलेला इसमाचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव गिरधारीलाल दिनदयाल शाहू, वय 35 वर्षे, राहणार पिनकपार, जिल्हा बालोद असे सांगितले त्यानंतर काही वेळातच ्या गाडीच्या मागोमाग आणखी एक पांढर्या रंगाची बोलेरो पिकप गाडी चालकाने शंभर मीटर अंतरावर थांबवून,गाडीतून चालकाने पोबारा केला. चिचगड पोलिसांनी पंचांसमक्ष दोन्ही वाहनांची पाहणी केली असता, वाहन क्रमांक सीजी 08, ए एन 2058 किंमत 2 लाख रुपये ची पाहणी केली असता, गाडीच्या मागच्या डाल्यात 19 देसी दारूच्या पेट्या किंमत 57 हजार रुपये, तर दुसऱ्या बोलोरो पिकअप गाडी क्रमांक सीजी 07, सी डी 0154 किंमत 2 लाख रुपये,या वाहनात 11 देशीदारू च्या पेट्या, किंमत 33 हजार रुपये असा एकूण चार लाख 90 हजार रुपयांचा माल अवैधरित्या विनापास परवाना, विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आल्याने, फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून पोलीस ठाणे चिचगड येथे अपराध क्रमांक 61/2021 कलम 65 (ई),77(अ),72, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 188, 269, 270 भादंवि सहकलम 51(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये नोंद करून, गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस नायक दुर्गादास गंगापारी हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली, चिचगड पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, पोलीस नायक दुर्गादास गंगापारी, पोलीस शिपाई विष्णू राठोड, रवी जाधव, संदीप तुलावी यांनी केली आहे.
गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक विश्व पानसरे यांनी covid-19 मध्ये विशेष मोहीम म्हणून, अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी, मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. हे येथे उल्लेखनीय आहे.