प्रा.आरोग्य उपकेंद्र नकोडा येथे डॉ.दास सह 160 व्यक्तीचे लसीकरण
आज दि.6 मे रोजी नकोडा येथील आरोग्य उपकेंद्रात डॉ. दास यांनी लस घेण्यास नोंदणी केली व कोविड लस घेतली. नकोडा परिसरातील 160 नागरिकांनी लसीकरणाच्या लाभ घेतला . लसीकरण केंद्रावर उपस्थित मा.श्री ब्रिजभूषनजी पाझारे माजी समाज कल्याण सभापती व विद्यमान सदस्य जि.प चंद्रपुर , डॉ. परमेश्वर वाकडकर यांची उपस्थिती होती. गावातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्याची सर्वस्व जवाबदारी नकोडा गावातील सरपंच किरण बांदूरकर व उपसरपंच मंगेश राजगडकर यांनी घेतली आहे.
ग्रा.प सदस्यांनी गावातील 45 वयोगटावरील लोकांना लसीकरणाची दुसरी लस घेण्यास प्रोत्साहीत केले.
उपकेंद्रात सुरू झालेल्या लसीकरणामुळे गावातील प्रत्येक नागरिकांना कोविड ची प्रथम व द्वितीय लस घेण्यास सोयीस्कर झाले.
यावेळी उपस्थित पं. स सदस्य सविताताई कोवे, माजी सरपंच ऋषी कोवे, ग्राप सदस्य-अर्चना पाझारे , तनुश्री बांदूरकर, सुजाता गिड्डे, हेमा ताला, विठ्ठल (रज्जत) तुरणकर, जसप्रीतसिंग कोर, प्रभाकर लिंगमपेल्ली,कंपा राजय्या,कांचन ताई वाकडे तसेच प्रा. आ.कर्मचारी वर्ग उपस्थित होते.