शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी):
'धोनी' नाव घेतलं की आपल्याला क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आठवेल मात्र याला अपवाद वरोऱ्याचा धोनी. मुळात त्याचं नाव विनोद चिकाटे नेहमी हसतमुख असणारा प्रत्येक मित्राचा हार्टफेलो असा हा विनोद उर्फ धोनी काल रात्रोला काळा आड सर्वाना सोडून गेला. 4 मे ला 32वा वाढदिवस येणार होता मात्र काळाने नियत फिरविली व त्याला सर्वांपासून दूर घेऊन नेले.धोनीचं व्यक्तिमत्त्व म्हणजे लहानपनापासून त्याने असे कुठलेही काम नाही जे केले नसेल.फोटोग्राफीपासून त्याची ओळख.महाराष्ट्र फोटो स्टुडिओचे तो काम करायचा, त्याने पेट्रोल पंप वर सुद्धा काम केले होते, घराचे पेंटिंगचे काम केले, फोटोग्राफी, सोबतच वरोऱ्यातील पत्रकार मित्रांना बातमी साठी फोटो काढून देने न्यूज चॅनल करिता बातमीचे चित्रीकरण करणे, नुकताच तो डॉ.सागर वझे यांच्या दवाखान्यात काम करायचा. एक ना अनेक कामाचे अष्टपैलू व्यक्तीत्व धोनीचं. त्याच्या मागे आई वडील एक भाऊ व एक बहीण असा परिवार.28 मार्च ला डॉ सागर वझे कडून सुट्टी घेतली ती आपल्या बहिणीला पुण्यावरून आणण्यासाठी मात्र तो पुण्याला गेला नाही. तर लोधिखेडा येथे लग्नाचे ऑर्डर मारण्यासाठी गेला व तिथून त्याची तब्बेत खराब झाल्याचे कळले. काल 3 ता. त्याला डॉ मुळेवार यांच्या कडे दाखविण्यात आले मात्र ऑक्सिजन लेव्हल फारच कमी असल्याने त्याला ताबडतोब चंद्रपूर ला हलविण्यात आले मात्र वेळ निघून गेल्याने 3 तारखेला रात्री 10 वाजता। निधन झालं. धोनी वरोरा वासीयांना सोडून नेहमीसाठी गेला. त्याच्या गेल्याने एक पोकळी निर्माण झाली ती भरून निघणार नाहीचं...त्याच्या साठी दोन ओळी
रूठ के हमसे कही जब चले जाओ गे तुम
ये ना सोचा था कभी इतने याद आयोगे तुम !