सोलर इंडिया ग्रुप कडून ग्रामीण रुग्णालयास 6 ऑक्सीजन मशीनदान
# कोविडचे वाढते रुग्णांना होणार मदत
# उपविभागीय अधिकारी उंबरकर यांनी मानले आभार
सुधीर बुटे
काटोल : कोविड वैष्णव महामारी या गंभीर आजारामुळे वाढती रुग्ण संख्या बेड, ऑक्सीजन पुरेशी व्यवस्थे अभावी अनेकांना प्राणास मुकावे लागत असतांना काटोल उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी सोलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला प्रस्ताव दिला त्यांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता स्थानिक काटोल ग्रामीण रुग्णालयाला सहा (6) ऑक्सीजन concentrator मशीन आज शुक्रवार दिनांक 16 मार्चला दान दिल्या. नागपूर शहरात हॉस्पिटलमध्ये अति वाढते करोना बाधित रुग्णामुळे व्यवस्था तोकडी पडत आहे. काटोल ग्रामीण रुग्णालयात तालुक्या सोबत नरखेड येथील रुग्ण उपचार घेत आहे. सोलर ग्रुपचे मदतीने आता ऑक्सीजन लागणाऱ्या कोविड रुग्णाला काही अंशी दिलासा मिळाला आहे. सोलर इंडस्ट्रीजचे प्रबंधक सत्यनारायण नुवहाल यांनी जनरल मॅनेजर सोमेश्वरजी मुंदडा यांना त्वरित साहित्य पुरविण्याचा होकार दिला. त्यांनी 3 लक्ष 30 हजार किंमतीचे सहा ऑक्सीजन मशीन ग्रामीण रुग्णालयाचे सुपूर्त केले.
##$$$##
सोलर ग्रुपचे सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान- सोमेश्वर मुंदडा, व्यवस्थापक
चाकडोह ,शिवा अडेगाव परिसरात कार्यक्षेत्र असणारे सोलर इंडस्ट्रीजचे सामाजिक क्षेत्रात सतत योगदान राहिले आहे. संकटकाळी परिस्थितीत परिसरात लागलेल्या आगेच्या घटनेत 4 अग्निशामक बंब, पाणीचे टँकर, सदैव तत्परतेने अनेक घटनेत मदतीला येऊन वनसंपदा, अन्य संपत्तीचे नुकसान वाचविण्यास यशस्वी ठरली आहे.स्वच्छता अभियानात नुकतेच बाजारगाव ग्रा प कचरा वाहतूक वाहन, परिसरात अनेक ग्राम पंचायतीला मदत, वृक्षारोपण आशा अनेक राष्ट्रीय अभियानात कंपनीचा सदैव सहभाग असल्याचे प्रतिक्रिया जनरल व्यवस्थापक सोमेश्वर मुंदडा यांनी याप्रसंगी दिल्या.
सोलर ग्रुपचे आभार व इतरांना प्रेरणा - एसडीओ उंबरकर
कोविड जीवघेणा आजारावर शासन पूर्ण प्रयत्नरत आहे . कोविडचा अति वाढता प्रादुर्भाव व होणारी गंभीर परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरिता असल्यामुळे सोलर ग्रुपचे संचालक सत्यनारायण नुवहाल यांचे सहकार्य बद्दल आभार मानले. परिसरातील सेवाभावी , सामाजिक संस्थांना यामुळे प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी व्यक्त केली.
ग्रामीण रुग्णालयाचे व्यवस्थेत भर- डॉ दिनेश डवरे आरोग्य अधीक्षक
काटोल ग्रामीण रुग्णालय करोना करीत सतत कामगिरी बजावत आहे. हॉस्पिटलचे सहकारी डॉ नरेंद्र डोमके, सुधीर वाघमारे आदींसह सर्व कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत आहे. रुग्णालयात सोलर ग्रुप कडून मिळालेले साहित्य उपयुक्त ठरून करोना आरोग्य सुविधांचा रुग्णाचे सेवेत भर घालणारं नक्की ठरणार आहे.