राजुरा- कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच राजुरा तालुक्यातील गोवरी येथे तापाने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रेमीला लटारी वाघमारे(४८)असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.कोरोणा संकटात नियमाचे पालन करीत निराधार महिलेचे अंत्यसंस्कार वॉर्डातील नागरिकांनी केले. संबुद्ध पंचशील मंडळाचे अध्यक्ष दिनेश घागरगुंडे,ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ कासवटे,सुभाष घागरगुंडे,सुरेश कासवटे, ,संदीप कासवटे, संदीप कासवटे, राकेश वाघमारे, प्रमोद पडवेकर, सुमेश कोल्हे, बंडू करमणकर, विठल गोरघाटे,बार्शीधर वाघमारे यांच्या पुढाकारातून अंत्यसंस्कार करण्यात आले .
निराधार प्रेमिलाबाई ८ दिवसापासून तापाने आजारी पडली होत्या. ताप आल्याने त्यांनी राजुरा येथील खासगी दवाखान्यात उपचारही केला होता. परंतु रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली. प्रेमिलाबाई घरी एकटीच राहत असल्याने रात्री दवाखान्यात उपचार करायला नेण्यासाठी घरी कुणीही नव्हते. त्यामुळे प्रेमिला बाईची प्रकृती बिघडल्याने तिचा मृत्यू झाला. सकाळी प्रेमिलाबाई उशिरापर्यंत उठली नसल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच प्रेमिला बाईचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.या घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच प्रेमिला बाईला पाहण्यासाठी तिच्या घराकडे नागरिकांनी धाव घेतली. कोरोणा संसर्ग असल्याने नियमांचे पालन करून गावकऱ्यांच्या उपस्थितीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.