गावात तापाची साथ...नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान
राजुरा- तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये तापाची साथ सुरू असल्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. मागील दोन आठवड्यापासून गौवरी, रामपूर क्षेत्रामध्ये तापाची साथ सुरू असल्यामुळे आरोग्य विभागाने आज दिनांक 17 एप्रिल ला गौवरी येथे तपासणी शिबिर घेतले व गावातील नागरिकांची ऑंटीजीन चाचणी घेतली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौवरी येथे सकाळी 10 वाजल्यापासून अँटीजीन तपासणी सुरू आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिपिन ओडेला, डॉक्टर प्रकाश कुंभारे, आरोग्य सेविका,सरपंच आशा उरकुडे, उपसरपंच उमेश मिलमिले, सर्व सदस्य, ग्राम विकास अधिकारी तुतारे शिबिरात उपस्थित होते .गावातील नागरिकांना तपासणी करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिवंडी पीठवण्यात आलेली होती आणि लोकांनी स्वतःहून आपल्या कुटुंबातील सदस्यांची कोबीड तपासणी करावी असे आव्हान करण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गावातील जीवनावश्यक वस्तूचे दुकान वगळता इतर दुकाने पूर्णपणे बंद करण्याच्या सूचनाचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले.
मागील दोन आठवड्यापासून तालुक्यातील गौवरी, रामपूर येथे क्षेत्रात तापाच्या साथीने नागरिक हैराण आहेत. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातही नागरिक दहशतीखाली आहेत. तालुक्यात ग्रामीण क्षेत्रामध्येही कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचललेली आहेत. राजुरा तालुक्यात आतापर्यंत गोवरी आणि रामपूर येथे ॲक्टिव रुग्ण सर्वाधिक असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये यासाठी गावांमध्ये आरोग्य कर्मचारी भेटी देऊन समजावून देत आहेत. गावातील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी सुद्धा लोकांच्या जनजागृती अभियानात सहभागी झालेले आहेत. तापाची साथ असल्यामुळे नागरिक दवाखान्यात कोवीड चाचणी करावी व आपले आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी यासाठी प्रत्येक वार्डात स्वयंसेवी संस्था पदाधिकारी सुद्धा फिरत आहेत. संबुद्ध पंचशील मंडळाचे अध्यक्ष दिनेश घागरगुंडे , ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ कासवटे , सुरेश कासवटे, संदीप कासवटे, राकेश वाघमारे, प्रमोद पडवेकर, सुमेश कोल्हे, बंडू करमणकर, सुभाष घागरगुंडे ,विठल गोरघाटे,बर्शिधर वाघमारे,नयन चुनारकर हे पुढाकार घेऊन लोकांमध्ये जनजागृती करीत आहेत.
राजुरा तालुक्यात ग्रामीण भागात सद्यपरिस्थितीत कोवीड चे 102 रुग्ण अॅक्टिव आहेत. यात सर्वाधिक रुग्ण रामपूर व गोवरी येथे ॲक्टिव रुग्णांची संख्या आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकरदार वर्ग राहत असल्यामुळे स्थलांतरण व ये-जा मोठ्या प्रमाणावर असते .त्यामुळे नागरिकांनी लक्षणे आढळल्यास covid चाचणी करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश नगराळे यांनी केलेले आहे .
ग्रामपंचायत कार्यालय गौवरी यांच्या सूचनेनुसार तापाची साथ असल्यामुळे नागरिकांची ऑंटीजीन तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी चाचणी करावी . डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यास रुग्णाने कोविंड केंद्रावर उपचार घ्यावे .शासनांच्या नियमाने काटेकोरपणे पालन करावे. नागरिकांनी गावात इकडे तिकडे भटकू नये .किमान दहा दिवस कडक नियम पाळणे गरजेचे आहे.- डॉक्टर विपिन ओढेला ,
वैद्यकीय अधिकारी ,कडोली.