Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल १७, २०२१

चंद्रपूर शहरात आणखी दोन कोविड केअर सेंटर सुरु होणार

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी मनपा सज्ज

चंद्रपूर, ता. १७ : शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता आपत्तीजनक परिस्थितीला तोंड देण्यासाठी महानगर पालिका सज्ज झाली आहे. सध्या मूल रोड येथील वन अकादमीतील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून आरोग्यसेवा कार्यान्वित आहे. सैनिकी शाळा येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आणखी दोन कोविड केअर सेंटर प्रस्तावित आहेत.

चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू केले आहेत. उपचारासाठी वन अकादमी येथील तीन इमारतीत ३०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या येथे २१९ रुग्ण भरती आहेत. यात १२५ पुरुष रुग्ण तर ९४ महिला रुग्णांचा समावेश आहे. यात १४ वर्षाखालील आठ रुग्ण तर ६० वर्षांवरील १९ रुग्ण उपचार घेत आहेत. मागील वर्षभरात एकूण ४६६९ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले. यातील ३९११ रुग्ण उपचाराअंती बरे झालेत. सध्या  कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता चंद्रपूर महानगरपालिका सर्व प्रयत्न करीत आहे. कोरोना प्रतिबंधासह उपचारासाठी सैनिकी शाळा येथे ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. शनिवारी दुपारपर्यंत येथे २९० खाटा उपलब्ध होत्या. येथे वैद्यकीय अधिकारी आणि परीचारिकांसह कर्मचारी आरोग्य सेवेसाठी तैनात आहेत.

कोरोनाची ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दूध डेअरी परिसरातील समाजकल्याण विभागाचे आदिवासी मुलींचे वसतिगृह आणि मुलांचे वसतिगृह येथे अनुक्रमे १८० आणि १२० खाटांची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर प्रस्तावित आहेत. याशिवाय २५० खाटांच्या सुविधेसह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरु करण्यास महानगर पालिका सज्ज आहे. चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात सात कोव्हिड चाचणी केंद्र सुरू आहेत. नागरिकांना आपली तपासणी इंदिरानगर, रामनगर, बालाजी वॉर्ड, बगड खिडकी, बाबुपेठ, भिवापूर,महानगर पालिकेच्या हेल्थ पोस्ट सेंटर आणि तुकूम येथील काईस्ट हॉस्पिटलमध्ये करता येईल.  



नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.