नागपूर : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आज ११ एप्रिल २०२१ रविवारला भारतात साय ६ ते साय १० पर्यंत ,अमेरिका सकाळी ८.३० वाजता व दुपारी १.३० वाजता लंडन येथून ऑनालाईन वेबिनार घेण्यात येणार आहे. या वेबिनारचे उद्द्याटन मतद व पुनवर्सन तथा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्र्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री राजेंद्र पाल सिंग, सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही. ईश्वरैया, भाजप ओबीसी मोर्चाचे अयक्ष डॉ. के. लक्ष्मण, माजी मंत्री महादेव जानकर, हरियाणाचे माजी खासदार राजकुमार सैनी, इंदरजीत सिंग, अमेरिकेतून डॉ. हरी इपण्णापेल्ली, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे उपस्थित राहणार आहे. यावेळी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सुधांशु कुमार, ऑल इंडिया ओबीसी फेडरेशनचे सचिव जी. करूनानिधी, कलिंदी महाविद्यालयाच्या सहाय्यक प्रा. डॉ. सीमा माथूर या महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहे. या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या वेबिनारला मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव तथा कार्यक्रम समन्वयक सचिन राजुरकर यांनी केली आहे.
Website Registration Link http://robcm.in