पाणीपट्टी वसुलीमध्ये पाटबंधारे उपविभाग गोंदिया विभागात अव्वल
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध ता.३.
गोंदिया पाटबंधारे विभागा अंतर्गत नवेगावबांध पाटबंधारे उपविभागाने वित्तीय वर्ष २०२०-२१मध्ये विक्रमी १२९.५९ टक्के वसुली करून गोंदिया विभागात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
सिंचन पाणीपट्टी व बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीमध्ये उपविभाग नवेगावबांध गोंदिया पाटबंधारे विभागातुन पहिल्या क्रमांकावर आहे. या उपविभागाने वित्तीय वर्ष २०२०-२१ मध्ये पाणीपट्टीचे उद्दिष्ट सिंचन ४.७० लक्ष रुपये एवढे होते.दि.1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 21 पर्यंत ५.०९ लक्ष रुपये वसूली करण्यात आली. तर बिगर सिंचन वसूली ३.५० लक्ष रुपये उद्दिष्ट होते.तर वसूली ४.८८ लक्ष रुपये करण्यात आली.एकूण वसूली ८.२० लक्ष रुपये उद्दिष्ट होते,मात्र या उपविभागाने ९.९७ लक्ष एवढी विक्रमी वसूली करून गोंदिया विभागात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. विक्रमी वसुलीची १२९.५९टक्केवारी आहे.
समीर बनसोडे उपविभागीय अभियंता यांचे अथक परिश्रम व कनिष्ठ अभियंता डहाणे,शभेलावे तसेच कर्मचारी चव्हाण ,पाटील, संदीप बोळणकर, शिवणकर, मेश्राम यांचे माोलाचे सहकार्य लाभले.अशी माहिती उपविभागीय अभियंता समीर बनसोडे यांनी दिली आहे