आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
भारतीय जनता पार्टीचा उपक्रम
विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष,माजी वित्तमंत्री व जिल्ह्याचे माजी पालक मंत्री,आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ठिकाणी यापूर्वी बसविण्यात आलेल्या स्वयंचलित सॅनेटायझर मशीनसाठी सॅनेटायझर वितरणाला सुरवात करण्यात आली आहे. सोमवार १९एप्रिलला चंद्रपुर व बल्लारपूर येथे सॅनेटायझर(कॅन) वितरित करण्यात आल्यानंतर शनिवार २४ एप्रिलला मूल व पोंभुर्णा वितरण करण्यात आले.विशेष म्हणजे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या स्वयंचलित मशिन्स १२५ स्थानी आ मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
भारतीय जनता पार्टी चंद्रपुर तर्फे हा सेवा प्रकल्प राबविला जात असून या सेवा प्रकल्पाचे संयोजक भाजपा (महानगर)कोषाध्यक्ष प्रकाश धारणे व महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,प्रशांत विघ्नेश्वर,मयूर चहारे, देवा बुरडकर यांच्या देखरेखीत वितरण करण्यात आले.
मागील वर्षी कोरोनाने हाहाकार माजवल्यावर आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार जनतेला मदतीचा हात देत अनेक लोकोपयोगी सेवा उपक्रम राबविले.ज्यात मास्क वितरण,श्रीराम धान्य किट,रक्तदान,सुरक्षा किट,आरोग्य तपासणी,जनजागृती,दिव्यांगांना शासनाच्या योजनेतून अर्थ साहाय्य,पीपीई किट,इ पास,परप्रांतीय मजुरांना धान्य वितरण आदींचा यात प्रामुख्याने समावेश होता.याच उपक्रमाचा एक भाग म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध गर्दीच्या सार्वजनिक स्थानी सॅनेटायझर मशीन उपलब्ध करून देण्यात आली. त्या स्वयंचलित मशीन साठी सॅनेटायझरचे वाटप आता केले जात आहे.
दैनंदिन व शासकीय कामासाठी आलेल्यांची गर्दी होणाऱ्या १२५(जिल्ह्यातील) जागांची निवड कोरोना संकटात करण्यात येऊन तेथे आ मुनगंटीवार यांनी संसर्ग टाळून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणून सॅनेटायझर मशीन उपलब्ध करून दिली.पोलीस स्टेशन,बँक,नगरपालिका,तहसील कार्यालय,शासकीय रुग्णालये,पत्रकार संघ भवन, पोस्ट ऑफिस आदींचा यात समावेश होता. त्या सर्व मशीन साठी १००० लिटर सॅनेटायझर उपलब्ध करून देण्याचे वचन काही दिवसांपूर्वी आ सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. सोमवार(१९एप्रिल)ला चंद्रपुर महानगरातील सिटी पोलीस,वाहतूक पोलीस शाखा,पोलीस मुख्यालय,रामनगर पोलीस स्टेशन,दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे प्रकाश धारणे ब्रिजभूषण पाझारे यांचे हस्ते वितरण करण्यात आले. बल्लारपूरला पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर-विसापूर,तहसील कार्यालय बल्लारपूर,नालंदा क्रीडा मंडळ बल्लारपूर,ग्रामपंचायत विसापूर व चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ येथे नगराध्यक्ष हरीश शर्मा,भाजपा नेते काशीसिंह मनीष पांडे यांचे हस्ते वितरण करण्यात आले.
शनिवार(२४एप्रिल)ला पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र नगरपंचायत सी डी सी सी बँक इंडियन बँक पोलीस स्टेशन तहसील कार्यालय पंचायत समिती डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय व ग्रामपंचायत बल्लारपूर येथे भाजपा तालुका अध्यक्ष गजानन गोरंटिवार व पंचायत समिती सभापती अल्का आत्राम यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी भाजयुमोचे अध्यक्ष अजय मस्के, शहर अध्यक्ष विनोद कानमपलीवार, आशिष दाशेट्टीवार, महेंद्र सोनुले यांची उपस्थिती होती.