▪️पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आश्वासनांची तारिख
▪️वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही हात झटकले
चंद्रपूर/ प्रतिनिधी
चंद्रपुरातील covid-19 मध्ये काम केलेल्यांना सात महिन्याचे किमान वेतन मिळावे या मागणीसाठी मागील काही दोन महिन्यांपासून सुरू असलेले डेरा आंदोलन संपण्याची चिन्हे पुन्हा धुसर झाली आहेत. आज पालकमंत्री विजय वङेट्टीवार आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे पप्पू देशमुख यांच्यात बैठक झाली असली तरी हा निधी कोणत्या विभागांकडून देण्यात येणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ही मागणी पूर्ण करण्यात हतबलता दाखविली आहे. दुसरीकडे चंद्रपूरचे पालकमंत्री केवळ आश्वासनांची तारिख देऊन महिलांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
सात महिने विनावेतन काम करणाऱ्या महिला योद्ध्यांनी किमान वेतन या प्रमाणे मजुरी मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन सुरू आहे. तीन दिवसापूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या महिलांना पोलिसांमार्फत झोडपून काढू, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांचे वादग्रस्त ऑडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर सर्वत्र टीका होऊ लागली. यामुळे अखेर विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनाचे नेते पप्पू देशमुख यांची यांच्याकडे माफी मागून तीन दिवसात या सर्व मजुरांचे खात्यात कामगाराचे खात्यात पैसे जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. नाराजी वाढू नये म्हणून पप्पू देशमुख यांनीही नैराश्याचे कारण देत वादाला पूर्णविराम दिला. आज नागपूर येथे विजय वडेट्टीवार यांचे सोबत पप्पू देशमुख यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर या कामगारांना तीन दिवसात न्याय मिळेल, ही आशा धुळीस मिळाली आहे.
पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी डेरा आंदोलनात सहभागी असलेल्या कामगारांच्या वेतनाचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार अमित देशमुख यांचे सोबत च्या बैठकीत मांडला. हा प्रस्ताव नामदार देशमुख यांनी तत्वतः मंजूर केला. मात्र अधिकाऱ्यांनी यात खोडा घातल्याने नामदार देशमुख यांनी किमान वेतन याप्रमाणे वेतन देणे शक्य नसल्याची भूमिका घेतली. याबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी हतबलता दाखविल्याची माहिती आहे. या डेरा आंदोलनाला आता भाजपानेही पाठिंबा जाहीर केल्यामुळे हे आंदोलन कोणते वळण घेईल, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.