Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०८, २०२१

चंद्रपूरकरांनो सावधान! 668 पॉझिटिव्ह ; नऊ मृत्यू

 गत 24 तासात 218 कोरोनामुक्त 

668 पॉझिटिव्ह ; नऊ मृत्यू

Ø  आतापर्यंत 26,918 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 3794




चंद्रपूर, दि. 08 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 218 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 668 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून नऊ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 31 हजार 168 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 918 झाली आहे. सध्या 3794 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 91 हजार 853 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 56 हजार 203 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये वणी येथील 36 वर्षीय पुरुष, शेगाव वरोरा येथील 40 वर्षीय पुरुष, रामदेव बाबा मंदिर, वरोरा येथील 80 वर्षीय महिला, नागभीड येथील 67 वर्षीय महिला, भेमदाडा, राजुरा येथील 52 वर्ष महिला, रामपूर राजुरा येथील 52 वर्षीय पुरुष, चिमूर येथील 50 वर्षे महिला, वरोरा शहरातील  60 वर्षीय पुरूष व 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 456 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 413, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 19, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 668 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 175, चंद्रपूर तालुका 50,  बल्लारपूर 36, भद्रावती 37, ब्रम्हपुरी 21, नागभिड 31, सिंदेवाही नऊ, मूल 37, सावली 23, पोंभुर्णा एक,  गोंडपिपरी दोन, राजूरा 25, चिमूर 39, वरोरा 133, कोरपना 37, जीवती दोन व इतर ठिकाणच्या 10 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.