Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल २४, २०२१

सामाजिक संस्था ,राधाबाई हर्डिकर संस्था

सामाजिक संस्था

राधाबाई हार्डीकर प्राणिजात मंगल संस्था

____________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
____________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/3va3frA
मागील काही वर्षात आपल्या समाजात विविध विषयांची बरीच जनजागृती होत आहे. अनेक संस्था, प्रतिष्ठान आपापल्या परीने समाजासाठी आपापले योगदान देत आहेत. याचा अभिमान नक्कीच आहे. नावे आणि कार्ये जरी वेगवेगळी असली, तरी त्यांचा अंतिम उद्देश समाजासाठी काही भरीव कार्य करणे हाच असतो. आजही अनेक संस्था अशा आहेत ज्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचत नाही. या संस्थांचे कार्य सर्वत्र पोहोचवता यावे, त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना मिळावी म्हणुन माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव आपणास काही सामाजिक संस्था व त्यांच्या कार्याची माहिती देत आहे
संस्थेचे नाव: राधाबाई हार्डीकर प्राणिजात मंगल संस्था
(आपण मदत करीत असलेले संस्थेचा प्रकल्पः सुमति बालवन, पाखरमाया)
पत्ता: १२१५२, कांचनश्री, शिरोळे रोड, फर्ग्युसन कॉलेज समोर, शिवाजीनगर, पुणे, ४११००१
फोनः २५५३१८८१
मोबाईल: 098601 93656
संस्थेचे कार्य
२००१ साली स्थापना झालेल्या राधाबाई हार्डीकर प्राणिजात मंगल संस्थेद्वारे कात्रजच्या पुढे असलेल्या गुजर-निंबाळकरवाडी ह्या गावात आर्थिक दृष्ट्या हालाखीची परिस्थिती असलेल्या मुला-मुलींकरता सुमती बालवन ही शाळा तर गरजू आणि अनाथ मुलांकरता पाखरमाया अनाथाश्रम चालवला जातो.


शिकायला शाळा आणि राहायला निवारा येथे ह्या संस्थेचे काम संपत नाही, तर सुरु होते! मुलांना ही शाळा व संस्था म्हणजे आपले घर वाटते. एखाद्या घरातले मूल जितक्या विश्वासाने व मोकळेपणाने वावरते त्याच मोकळेपणाने येथील मुले वावरतात. त्यांच्यावर प्रेम करणारी, त्यांना आधार देणारी, त्यांना शिस्त लावणारी व वेळप्रसंगी त्यांना रागावणारी मायेची माणसे इथे त्यांना लाभली आहेत. सकारात्मक विचारांना कष्ट व प्रयत्नांची जोड देण्याचे बाळकडू येथे मुलांना लहानपणापासून मिळते. येथील मुले स्वस्थ बसत नाहीत. आपले छंद, अभ्यास यांच्या जोडीला मोकळ्या वेळेत शाळेत व परिसरात श्रमदानही करतात. सुमति बालवन शाळा व पाखरमाया अनाथाश्रम शाळेत सध्या साधारण १५० विद्यार्थी शिकत आहेत आणि त्यातील साधारण २५ मुलं ही वसतिगृहात राहतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच, लघूउद्योगाचे शिक्षण देऊन लवकर स्वावलंबी बनविण्याकडे शाळेचा कल आहे. अनाथाश्रम आणि वसतिगृहातील मुलांचा राहण्याचा, शाळेचा खर्च, सकस आहार, वैद्यकीय मदत हे सर्व संस्थेमार्फत केले जाते.

सुमति बालवनला आपल्या मदतीची अपेक्षा आहे.
रजिस्ट्रेशन क्रमांकः महाराष्ट्र/८४६/२००१/पुणे Ⓜ


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.