सेवाभावी संस्था कोकण
भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग
फेसबुक लिंक http://bit.ly/3nfiaOC
मागील काही वर्षात आपल्या समाजात विविध विषयांची बरीच जनजागृती होत आहे. अनेक संस्था, प्रतिष्ठान आपापल्या परीने समाजासाठी आपापले योगदान देत आहेत. याचा अभिमान नक्कीच आहे. नावे आणि कार्ये जरी वेगवेगळी असली, तरी त्यांचा अंतिम उद्देश समाजासाठी काही भरीव कार्य करणे हाच असतो. आजही अनेक संस्था अशा आहेत ज्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचत नाही. या संस्थांचे कार्य सर्वत्र पोहोचवता यावे, त्यांच्या कार्याची माहिती सर्वांना मिळावी म्हणुन माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव आपणास काही सामाजिक संस्था व त्यांच्या कार्याची माहिती देत आहे.संस्थेचे नाव :- भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग
पत्ता :- मुक्काम पोस्ट झारप,
तालुका:- कुडाळ,
जिल्हा:- सिंधुदुर्ग-४१६५२०
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
आपल्या देशाच्या संतुलित आणि सर्वांगीण प्रगतीसाठी खेड्यांचा विकास हा अत्यावश्यक आहे. अमर्याद वाढणारी शहरे आणि बकाल होत जाणारी गावे हे देशाच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे. शहरातील समृद्धी, पायाभूत सुविधा, दर्जेदार साधनांची व सोयींची उपलब्धता, शैक्षणिक आणि वैचारिक प्रगती प्रत्येक गावापर्यंत पोचणे गरजेचे आहे.
आजही आपल्या देशातील सर्व लोकांना वीज, पाणी, दोन वेळ पोटभर जेवण, शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा आपण पुरवू शकलेलो नाही. करोडो लोक आजही रोज संध्याकाळी अर्धपोटी आणि अंधारात झोपी जातात. हातावर पोट असणाऱ्या आणि हंगामी कामे करणाऱयांचे होणारे हाल तर आपल्या कल्पनाशक्तीच्यासुद्धा पलीकडचे आहेत.
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान गावांच्या आणि खेड्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. गावातील सोयीसुविधा पर्यावरणपूरक पद्धतीने सुधारणे, शैक्षणिक दर्जा वाढविणे, शेतीचे उत्पादन वाढविणे, ज्ञानकेंद्रीत शेती करणे, यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फ राबविले जातात. तसेच स्थानिक लोकांचे अंगभूत गुण, कौशल्य हेरून त्यांना पैलू पाडण्याचे काम पण संस्था अतिशय उत्तमप्रकारे पार पाडत आहे.
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
१. लमाणी वस्तीसाठी सोलर दिव्यांची योजना:- रस्ते, बांधकाम यासाठी लमाणी लोकं नदीकिनारी पालं टाकून झोपड्यांमध्ये राहतात. तिथे विजेची सोय नसते. लहान मुले, महिला यांच्यासाठी काळोख सुरक्षित नसतो. अशा वस्त्यांचा सर्व्हे करून त्यांना सवलतीमध्ये सोलर दिवा (LED) देणे. १०० स्क्वे.फु. साठी या दिव्याचा प्रकाश पुरतो. आपण कुडाळ येथील लमाणी वस्तीमध्ये असे दिवे दिले आहेत.
खर्च:- एका सोलर दिव्याची किंमत ७००/- रु. आहे. लमाणी कुटुंबांना तो दिवा पूर्णपणे मोफत दिला जाणार नाही. त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार काही ना काही किंमत जसे कि १०० ते २०० रुपये द्यावी लागेल.
२. कातकरी मुलांचे वसतिगृह व त्यांना खेळ शिकविण्यासाठी प्रशिक्षक योजना:-
गाव वेताळ बांबर्डे येथील वसतिगृहामध्ये कातकरी समाजातील एकूण १८ मुले आहेत. यासाठी शासनाचे काही अनुदान नाही. कातकरी समाजाची ही शाळेत जाणारी पहिलीच पिढी आहे. त्यांना लागणारा किराणा 'भगीरथ' देते. श्री उदय आईर येथील व्यवस्थापन पाहतात. येथील सर्व मुलांनी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हास्तरापर्यंत बाजी मारली आहे. त्यांना चांगले क्रीडा प्रशिक्षक दिल्यास तसेच प्रथिनयुक्त आहार दिल्यास (अंडी) ही मुले अजून प्रगती करतील.
सामाजिक उपक्रमाच्या निधीनुसार संस्थेच्या प्राधान्याप्रमाणे वरीलपैकी एका कार्यासाठी निधीचा सदुपयोग करण्यात येईल.
आपली मदत येथे देऊ शकता.
संपर्क:- डॉ प्रसाद देवधर, +९१९४२२५९६५००
ईमेल:- bhagirathgram@gmail.com
आयकर सवलत:- ८०जी
नोंदणी क्रमांक:- एफ/२१७४/ सिंधुदुर्ग
संकेतस्थळ:- http://www.bhagirathgram.org/