गृहभेट आपुलकीची अर्जुनी-मोर तहसील कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम , 430 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.10.
अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयाच्या वतीने संजय गांधी निराधार योजने अंतर्गत गृहभेट आपुलकीची या संकल्पनेतून जानेवारी ते मार्च 2021 दरम्यान तहसीलदार विनोद मेश्राम आणि संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार तसेच कर्मचाऱ्यांनी गावा गावात भेट देऊन, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विविध योजनेचे 449 अर्ज लाभार्थ्यांकडून भरून घेतले. यात संजय गांधी निराधार योजना 42, श्रावण बाळ सेवा योजना 134, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना 146, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना 69, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना 06, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना 52 असे एकूण 449 लाभार्थ्यांकडून प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन, अर्ज भरून घेण्यात आले.त्यापैकी 430 लाभार्थ्यांची अर्ज तात्काळ मंजूर करण्यात येऊन, त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. तर अर्ज पात्र नसल्याने 19 लाभार्थीचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहे. कोरोना च्या काळामध्ये संजय गांधी योजना अंतर्गत विविध योजनांचे लाभार्थी आहेत. त्यांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहू नये.त्यामुळे गृहभेट आपुलकीची या उपक्रमांतर्गत गावागावात जाऊन लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले. अशी माहिती अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी दिली आहे. गृहभेट आपुलकीची या उपक्रमाला वाढई नायब तहसीलदार संजय गांधी योजना, रिता गजभिये अव्वल कारकून, तागडे अव्वल कारकून यांचे सहकार्य लाभले. तहसील कार्यालयाच्या गृहभेट आपुलकीची या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र स्तुती केली जात आहे.तर या उपक्रमाबाबत लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाचे आभार मानले आहे.