नागपूर /अरूण कराळे (खबरबात )
वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या परिसरात पोलिसांची गस्त असतांना सोमवार २२ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास गुप्त माहीतीच्या आधारे अवैद्य वाहतुकीतील रेती भरलेला टाटा कंपनीचा ट्रक , एम एच ४० सी.डी ०५ ९ ७ ताब्यात घेतला असता . रॉयल्टी बाबत विचारणा केली असता चालक ते दाखविण्यास असमर्थ ठरला . चालक नामे सिद्धार्थ उमाजी सोमकुवर , वय ३२ , रा . ५५/७ किरणापुर ता . सावनेर जि . नागपूर व ( क्लिनर ) आकाश महेंद्र गजभीये , वय २४ वर्ष रा . किरणापुर ता . सावनेर जि. नागपूर यांनी त्यांचा मालक नामे शुभम पाडुरगं सुपारे , वय ३२ वर्ष रा . खापा ता.सावनेर जि . नागपूर याचे सांगण्यावरून आरोपी क्रमाक १ व २ दोन यांनी माथनी घाट ता.सौसर जि.छिंदवाडा म.प्र येथून गौणखनिज रेती माल ( वजन ३२४१० कि.ग्र ) किंमत अंदाजे २५,००० रू ट्रक कं . एम एच ४० सी.डी ०५ ९ ७ मध्ये शासनाचे परवानगी शिवाय स्वतःचे आर्थीक फायदयाकरीता संगनमत करून चोरून आणल्याने ट्रक किमती अंदाजे २५ लाख रूपये असा एकुण २५ लाख २५ हजार रुपायाचा माल घटनास्थळ पंचनामा प्रमाणे जप्त करून त्यांचे विरूद्व कलम ३७९ , ३४ भादवीचा गुन्हा दाखल करण्यात आला . सदर गुन्हयाचा शोध पोलिस ठाणेदार प्रदीप सुर्यवंशी याच्या मार्गदर्शनात पोलीस कॉन्सटेबल सुनिल मस्के ,प्रदीप ढोके,ईश्वर,अमोल आरोपी शुभम सुपारेचा शोध घेत पुढील तपास करीत आहे. तपास करीत आहे .